कागद दरवाढीचा फटका; दोनशे उद्योग अडचणीत

कागद दरवाढीचा फटका;  दोनशे उद्योग अडचणीत

सातपूर । प्रतिनिधी Satpur

करोना महामारीचा सामना करतानाच आता कागदाच्या दरवाढीमुळे hike of paper prices जिल्ह्यातील सुमारे 200 कोरोगेटेड बॉक्स उद्योग Corrugated box industry व त्यासोबतच पॅकेजिंग उद्योग Packaging industry मोठ्या अडचणीत सापडल्याचे चित्र आहे.

केंद्र आणि राज्य सरकारच्या काही चुकीच्या धोरणाचा विपरित परिणाम पॅकेजिंग उद्योगावर झाला असल्याचे चित्र आहे. गेल्या 20 दिवसांत कोळसा टंचाई, केमिकल दरवाढ, डिझेल दरवाढमुळे ट्रान्सपोर्ट खर्चातील वाढ, विजेची दरवाढ व कच्च्या मालाच्या आयातीतील घट या गोष्टीचा विपरित परिणाम पॅकेजिंग उद्योगावर झाल्याचे चित्र आहे.

जिल्ह्यातील कोरोगेटेड बॉक्स उद्योग तसेच मोठे व लहान पॅकेजिंगचे 200 उद्योग यामुळे अडचणीत आले आहेत. वाहन, इलेक्ट्रिक, इलेक्ट्रॉनिक वस्तू, वस्तू, फळे यांच्या पॅकेजिंगकरिता कोरोगेटेड बॉक्सचा मोठ्या प्रमाणात वापर होतो.

भारतातून याची मोठ्या प्रमाणावर निर्यातही होत असते. नाशिकमध्ये या क्षेत्रातील उद्योगांकडून दरमहा किमान 15 हजार टन निर्यात होते. मुळात कागदाचे दर 25 टक्क्यांनी कमी होणे खूपच गरजेचे आहे. केंद्र सरकारचा 12 टक्के जीएसटीवरुन 18 टक्के जीएसटीचा मोठा प्रभाव पडला आहे.

पॅकेजिंग ही दैनंदिन जीवनावश्यक वस्तू आहे. आज कोणतेही उत्पादन चांगल्या पॅकेजिंग शिवाय विकले जात नाही. पॅकेजिंगचा खर्च वाढल्यामुळे सर्व सामान्यांना प्रत्येक वस्तू महाग घ्यावी लागते. याचा भार सर्व सामान्यांनाही सहन करावा लागत आहे. शासनाने ज्या पद्धतीने शेतकर्‍याला प्रत्येक वेळी नुकसान भरपाई किंवा अतिरिक्त कर्ज सबसिडी व व्याज माफी योजना राबवून मदत केली. तशीच मदत अडचणीत सापडलेल्या उद्योजकांना झाली पाहिजे.

कागदाच्या वाढत्या किमतीवर सरकारने वेळीच पावले उचलली पाहिजेत, अशी अपेक्षा आहे. सरकारने वेळीच योग्य पावले उचलली नाहीत तर जिल्ह्यातील सुमारे 200 कोरोगेटेड इंडस्ट्रीज व मोठे व लहान पॅकेजिंग छपाई उद्योग बंद पडतील.

राजेंद्र छाजेड, संचालक महावीर पॅकेजिंग, सातपूर

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com