करोना अपडेट
करोना अपडेट
नाशिक

जिल्ह्यातील 'या' तालुक्यात सर्वाधिक रुग्ण संख्या

जाणून घ्या तालुक्यांची आकडेवारी

Gokul Pawar

Gokul Pawar

नाशिक | Nashik
जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील १९ हजार ९५१ करोना बाधीतांना डिस्चार्ज देण्यात आला असून सद्यस्थितीत ४ हजार ६३३ रुग्णांवर उपचार सुरु असलेल्या रुग्णामध्ये २०४ ने घट झाली आहे. आत्तापर्यंत ७०४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा सामान्य रुग्णालयाचे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. अनंत पवार यांनी दिली आहे.

उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण :

नाशिक ग्रामीण मध्ये नाशिक २५५, चांदवड ६८ , सिन्नर २३२, दिंडोरी ४२, निफाड २८५, देवळा ७५, नांदगांव १०८, येवला २६, त्र्यंबकेश्वर १९, सुरगाणा १०, पेठ ०१, कळवण ०७, बागलाण १००, इगतपुरी ४०, मालेगांव ग्रामीण १४४ असे एकूण १४१२ पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार आहे. तसेच नाशिक महानगरपालिका क्षेत्रात २ हजार ८२३, मालेगांव महानगरपालिका क्षेत्रात ६०५ तर जिल्ह्याबाहेरील ०८ असे एकूण ४ हजार ६३३ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तसेच आजपर्यंत जिल्ह्यात २५ हजार २८८ रुग्ण आढळून आले आहेत.

रुग्ण बरे होण्याची टक्केवारी

जिल्हयात रुग्ण बरे होण्याची टक्केवारी नाशिक ग्रामीण मधे ७३.७४, टक्के, नाशिक शहरात ८२.२७ टक्के, मालेगाव मध्ये ६५.६७ टक्के तर जिल्हा बाह्य रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण ८४.६६ टक्के आहे. तसेच जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमा ७८.९० इतके आहे.

मृत्यु :

नाशिक ग्रामीण १८६, नाशिक महानगरपालिका क्षेत्रातून ४००, मालेगांव महानगरपालिका क्षेत्रातून ९७ व जिल्हा बाहेरील २१ अशा एकूण ७०४ रुग्णांचा मृत्यु झाला आहे.

लक्षणीय :

◼️२५ हजार २८८ कोरोनाबाधित रुग्णांपैकी १९ हजार ९५१ रुग्ण पुर्णपणे बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज.

◼️सध्या जिल्ह्यात उपचार घेत असलेले ४ हजार ६३३ पॉझिटिव्ह रुग्ण.

◼️जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमाण
७८.९० टक्के.

*(वरील आकडेवारी आज सकाळी ११.०० वाजता जिल्हा सामान्य रुग्णालयाकडून प्राप्त माहितीच्या आधारे नमूद करण्यात आली आहे.)*

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com