६० वर्षांवरील वयोगटातील करोनाग्रस्तांचे सर्वाधिक मृत्यू
नाशिक

६० वर्षांवरील वयोगटातील करोनाग्रस्तांचे सर्वाधिक मृत्यू

Abhay Puntambekar

नाशिक । प्रतिनिधी Nashik

नाशिक शहरात करोना रुग्णांचा आकडा अकरा हजारावर गेला असुन मृतांची संख्या ३०० पर्यत जाऊन पोहचली आहे. गेल्या चार महिन्यात झालेल्या मृतात सर्वाधिक मृत्यू हे ६० वर्षावरील वयोगटातील करोनाग्रस्तांचे झाले आहे.

६ एप्रिल ते ३ ऑगस्टपर्यत नाशिक शहरात ११ हजार १७२ करोना रुग्ण आढळून आले असले तरी यापैकी ७ हजार ७४३ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहे. तर ३०० जणांचा मृत्यू झाला आहे. रुग्णालयात दाखल होत असलेल्या प्रमाणात मृत्यूचे प्रमाण चारच्या आत राहिले आहे.

सर्वाधिक मृत्यू जुलै महिन्यात झाले आहे. २ ऑगस्ट पर्यत झालेल्या २९५ करोना मृत्युत ६० वर्ष वयोगटावरील १४५ जणांचा मृत्यू झाला आहे. यातून करोनाचा मोठा फटका हा वृध्दांना बसला असुन या करोनाग्रस्तांची प्रतिकार शक्ती कमी झाल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com