नवीन नाशिक । प्रतिनिधी

करोनाकाळात शहीद झालेल्या पोलीस सेवकांच्या मुलांना पोलीस सेवेत सामावून घ्यावे, अशा आशयाचे निवेदन मनसेतर्फे पोलीस आयुक्तांना देण्यात आले.

राज्य सरकारने करोनामुळे शहीद झालेल्या पोलीस सेवकांच्या वारसांना पोलीस सेवेत सामावून घेणार असल्याचे आश्वासन दिले होते. महाराष्ट्रातील काही जिल्ह्यामध्ये शहिदांच्या वारसांना नियुक्ती पत्र दिले.

मात्र अद्यापपर्यंत नाशिकमध्ये याबाबत काही नियोजन नसल्याने मनसे जिल्हाप्रमुख दिलीप दातीर यांनी पोलीस आयुक्त दीपक पांडे यांची भेट घेऊन शहीद विजय शिंपी, अरुण टोंगरे, सुनिल शिंदे, राजेंद्र ढिकले, निवृत्ती जाधव, दिलीप भदाने यांच्या वारसांना पोलीस सेवेत सामावून घ्यावे, अशा आशयाचे निवेदन दिले.