अश्लेषा नक्षत्राची जोरदार हजेरी

अश्लेषा नक्षत्राची जोरदार हजेरी

निफाड । प्रतिनिधी | Niphad

आठ दिवसांच्या विश्रांतीनंतर अश्लेषा नक्षत्रातील (Ashlesha Nakshatra) पावसाने (rain) गत दोन दिवसांपासून तालुक्यात जोरदार हजेरी लावणे सुरू केले असून

तालुक्याच्या अनेक भागात मका (Maize), सोयाबीन (soybean), द्राक्षबागा (vineyard), टोमॅटो (tomato), कोथंबिर (Coriander) आदींसह शेतीपिकांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. दोन दिवस सततच बरसलेल्या पावसामुळे (heavy rain) रस्त्यांवर पाणी साचले तर निफाडच्या (niphad) आठवडे बाजारात देखील पावसाने दाणादाण उडवून दिली.

यावर्षी पावसाने प्रारंभीच जोरदार हजेरी लावल्याने खरिप हंगामातील (kharif season) पेरण्या वेळेवर पूर्ण झाल्या. मात्र ज्या पेरण्या उशिरा झाल्या त्या सततच्या पावसामुळे वाया गेल्या. परिणामी आठ दिवस पावसाने विश्रांती घेतल्यानंतर शिवारात शेतीमशागतीची लगबग सुरू झाली होती. मात्र गुरुवारी खेरवाडी (Kharewadi), सिद्धपिंप्री (Siddhapimpri), सुकेणे (sukene), ओणे, चांदोरी (chandori), ओझर (ozar) परिसरात पावसाने जोरदार हजेरी लावल्याने शेतात पाणी साचले होते.

तर काल शुक्रवारी दुपारनंतर निफाड, शिवरे, कुंदेवाडी, उगाव, शिवरे, नैताळे, कोठुरे, नांदूरमध्यमेश्वर, म्हाळसाकोरे, लासलगाव परिसरात पावसाने दमदार (heavy rain) हजेरी लावत व्यवसायिक व शेतकर्‍यांची तारांबळ उडवून दिली. शुक्रवार हा निफाडचा आठवडे बाजार असल्याने व्यापारी व ग्राहकांची या पावसामुळे तारांबळ उडाली.

निफाड (niphad) शहरातील प्रत्येक चौकात व गल्लीत पाणीच पाणी दिसत होते तर शिवार देखील जलमय झाला होता. खरिपाचा हंगाम यशस्वी होण्यासाठी पावसाने आता विश्रांती घ्यावी अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करीत असून सततच्या पावसामुळे हातात आलेली पीके वाया जाण्याचा धोका वाढला आहे. तसेच या पावसामुळे शालेय विद्यार्थ्यांचे मोठे हाल झाले होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com