आरोग्यविषयक योजना शेवटच्या घटकांपर्यंत पोहचवणार

आरोग्यविषयक योजना शेवटच्या घटकांपर्यंत पोहचवणार

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

केंद्र सरकारच्या (Central Government) आरोग्यविषयक योजना समाजाच्या शेवटच्या घटकांपर्यंत पोहचवू असे प्रतिपादन केंद्रीय आरोग्य व कुटुंबकल्याण राज्यमंत्री डॉ. भारती पवार (Dr. Bharti Pawar) यांनी केले...

त्या भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित जिल्हा शासकीय रुग्णालय येथे नवजात बालकांपासून ते 18 वर्ष वयापर्यंतच्या लाभार्थीसाठी आयोजित आरोग्य तपासणी व उपचार शिबीराच्या उदघाटन समारंभात बोलत होत्या.

व्यासपीठावर नाशिक शहराध्यक्ष गिरीश पालवे, महापौर सतिष कुलकर्णी, नाशिक ग्रामीण जिल्हाध्यक्ष केदा आहेर, आ. राहुल आहेर, आ. राहुल ढिकले, आ. सीमा हिरे, ओमप्रकाश शेटे, जिल्हा शल्य चिकित्सक अशोक थोरात, जिल्हा आरोग्य अधिकारी कपिल अहिरे, वैद्यकीय अधिकारी डॉ. निलेश पाटील, सरचिटणीस सुनिल केदार, जगन पाटील,

नाशिक ग्रामीण संघटन सरचिटणीस सुनिल बच्छाव, उत्तर महाराष्ट्र वैद्यकीय आघाडी प्रमुख डॉ. प्रशांत पाटील, नाशिक शहर वैद्यकीय आघाडी प्रमुख चंद्रशेखर नामपुरकर, मंडल अध्यक्ष अविनाश पाटील, ज्ञानेश्वर काकड, भास्कर घोडेकर, संतोष नेरे, योगेश खाचने, गणेश कांबळे, रोहिणी नायडू, माधुरी बोलकर आदी उपस्थित होते.

डॉ. पवार पुढे म्हणाल्या की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सर्वांसाठी आरोग्य सेवा हे स्वप्न साकार करण्यासाठी आपण स्वत:ला झोकून घेवू असे सांगून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मला भारताच्या जनतेची आरोग्याच्या सेवा माध्यमातून सेवा करण्याची संधी दिली याबद्दल मी त्यांचे आभार मानले.

कुठलाही बालक ते 18 वर्षापर्यंतचा लाभार्थी आरेाग्य सेवेसाठी वंचित राहणार नाही यासाठी मी व माझे सहकारी अहोरात्र काम करू असे सांगून या आरोग्य शिबीरात 13 हून अधिक नामांकित रुग्णालय व 75 हून अधिक तज्ञ डॉक्टरांचा समावेश असेल असे डॉ. पवार म्हणाल्या.

सेवा साधना फाऊंडेशनच्यावतीने डॉ. भारती पवार यांच्या हस्ते उपस्थित बालकांना मोफत आरोग्य किट वाटण्यात आले. प्रास्ताविक व ओमप्रकाश शेटे यांनी केले. सूत्रसंचालन सुनिल केदार यांनी केले तर आभार डॉ. निलेश पाटील यांनी मानले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com