प्रभारी मुख्याध्यापकास शिक्षकाने बदडले

प्रभारी मुख्याध्यापकास शिक्षकाने बदडले

ओझे/जानोरी | वार्ताहर | Oze/Janori

दिंडोरी तालुक्यातील (Dindori Taluka) कादवा म्हाळुंगी (Kadava Mhalungi) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे प्रभारी मुख्याध्यापक भास्कर जाधव (Headmaster Incharge Bhaskar Jadhav) यांना शालेय वेळेत कामकाज करताना शिक्षक (Teacher) कारभारी महाले यांनी मारहाण (Beating) केल्याचा प्रकार घडला आहे....

शिक्षकावर अद्याप गुन्हा दाखल न झाल्याने तालुक्यात याबद्दल उलटसुलट चर्चा चालू आहे. संबंधित मुख्याध्यापकावर वरिष्ठांचा काही दबाव तर येत नाही ना? असा संशय व्यक्त केला जात आहे.

या शिक्षकावर प्रशासनाने तत्काळ कारवाई करावी अन्यथा महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ शाखा दिंडोरी न्यायिक मार्गाने आंदोलन (Agitation) छेडेल, असा इशारा यावेळी देण्यात आला.

ही घटना संतापजनकच आहे. मारहाण झालेल्या मुख्याध्यापकांना संबंधित शिक्षकावर गुन्हा दाखल न करण्याबाबत कोणीही दबाव आणला नाही. त्यांचा निर्णय त्यांनी स्वतः घ्यावा. प्रशासन म्हणून आम्ही योग्य ती चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई होईल असे पाऊल उचलले आहे. त्याबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी यांना प्रस्ताव सादर करण्यात येणार आहे.

- भास्करराव कनोज, गटशिक्षणाधिकारी, दिंडोरी.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com