कडाक्याच्या थंडीत ‘वनप्रस्थ’चे श्रमदान

देवराई ऑक्सिजन पार्कसाठी 350 खड्डे
कडाक्याच्या थंडीत ‘वनप्रस्थ’चे श्रमदान

सिन्नर । प्रतिनिधी Sinnar

कडाक्याच्या थंडीतही (cold) शहरातील वनप्रस्थ फाउंडेशनचे (Vanaprastha Foundation) श्रमदान (Shramdan) सुरूच आहे. सकाळी सहा ते आठ असे रोज दोन तास श्रमदान केले जाते. देवराई प्रकारच्या ऑक्सिजन पार्कसाठी (Oxygen Park) आत्तापर्यंत 350 खड्डे खोदून पूर्ण झाले आहेत.

फाउंडेशनच्या 15 ते 20 स्वयंसेवकांचे श्रमदानासाठी योगदान लाभत आहे. ग्रामीण भागातील ऑक्सिजन पार्क साकारण्याचे काम वनप्रस्थ फाउंडेशनने हाती घेतले आहे. माझी वसुंधरा उपक्रमा (Vasundhara Undertaking) अंतर्गत नगर परिषदेने (nagar parishad) नाशिक-पुणे महामार्गावरील (Nashik-Pune Highway) सरदवाडी बायपास जवळील पुलालगत त्यासाठी भूखंड वनप्रस्थ फाउंडेशन कडे सुपूर्द केला.

त्यानंतर श्रमदानातून देवराई ऑक्सिजन पार्कची उभारणी करण्यात येत आहे. देवराई करिता 450 खड्डे खोदण्यात येणार आहेत. यापैकी 350 खड्डे खोदून पूर्ण झाले आहेत. एकूण 77 घनमीटर काम पूर्ण करण्यात आले. ऑक्सिजन पार्क मध्ये विविध प्रकारची दुर्मिळ औषधी वनस्पतींची लागवड करण्यात येणार आहे. भोवताली जॉगिंग ट्रॅक (Jogging track), ध्यान धारणा केंद्र, योगाभ्यासासाठी सुविधा, देवराई पार्कची माहिती देणारी डिजिटल झोपडी साकारण्यात येणार आहे. हे काम पूर्णपणे श्रमदानातून होत आहे.

सहा हजार झाडांचे जंगल

सिन्नर-घोटी महामार्गावरील आई भवानी डोंगरावर वनप्रस्थ फाऊंडेशनकडून 6 हजार झाडांची लागवड करुन जंगल तयार केले आहे. शिवडे घाटात पाणवठा, आई भवानी डोंगरावरील तलावाचे पुनरुज्जीवन त्याचबरोबर शहरातील कमळेश्वर बारवाचे पुनरुज्जीवन श्रमदानातून केले आहे. पाच वर्षापासून फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांकडून थंडी, पाऊस याची तमा न बाळगता दररोज दोन तास श्रमदान केले जाते. त्यातून विविध उपक्रम यशस्वी ठरविले आहेत.

श्रमदानात सहभागी व्हा

सरदवाडी मार्गावरील बायपास लगत देवराई ऑक्सिजन पार्क साकारण्यात येत आहे. त्यासाठी श्रमदानातून खड्डे खोदण्याचे काम केले जात आहे. विविध सामाजिक संस्था, नागरिकांनी श्रमदानात सहभागी व्हावे. देवराई ऑक्सिजन पार्कसाठी खारीचा वाटा उचलावा असे आवाहन फाऊंडेशनच्या कार्यकर्त्यांकडून करण्यात आले आहे.

Related Stories

No stories found.