शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून पालकमंत्री आक्रमक

शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून पालकमंत्री आक्रमक

नाशिक । प्रतिनिधी | Nashik

शेतकऱ्यांना पूर्ण दाबाने वीज पुरवठा (Power supply) करण्याबरोबरच जळालेले विद्युत रोहित्र ४८ तासात बसवा. शेतकऱ्यांच्या (Farmers) वाफ्यात पाणी जात नाही तोच वीज पुरवठा खंडित होतो. हा प्रकार तातडीने थांबवा अन् शेतकऱ्यांना सुरळीत वीजपुरवठा द्या असे आदेश पालकमंत्री दादा भुसे (Guardian Minister Dada Bhuse) यांनी अधिकाऱ्यांना दिले. 

जिल्हयातील वीज समस्या लक्षात घेऊन लोकप्रतिनिधी व महावितरणच्या अधिकाऱ्यांसमवेत भुसे यांनी गुरुवारी (दि.23) येथील आयआरएमटी कॉलेज (IRMT College) सभागृहात बैठक घेतली. यावेळी आ. सुहास कांदे, आ. राहुल आहेर, आ. हिरामण खोसकर आ. देवयानी फरांदेयांच्यासह  लोकप्रतिनिधी तसेच शेतकऱ्यांचे प्रतिनिधी उपस्थीत होते.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा...

 पंधरा दिवसांपासून शेतकऱ्यांची पिळवणूक होत असून विजेचा लपंडाव थांबवा, शेतकऱ्यांच्या सहनशीलतेचा अंत बघू नका. अन्नदाता आपल्यासाठी देव असून तातडीने वीजपुरवठा करा. अशा कडक शब्दात पालकमंत्री भुसे यांनी अधिकाऱ्यांना सुनावले.

शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून पालकमंत्री आक्रमक
ट्रॅक्टर नदीत कोसळल्याने एकाचा मृत्यू; दोन जखमी

एसीएफ फंडातून प्रत्येक तालुक्याला काम देण्यात यावे, नवीन सबस्टेशन (substation) मंजुरीचे प्रस्ताव रखडलेत त्यांचा पाठपुरावा करून काम सुरू करावे. तसेच ज्या कामांना मंजुरी आहे, मात्र किरकोळ मंजुरींसाठी काम थांबले असेल ते येत्या आठ दिवसात सुरू करून शेतकऱ्यांना दिलासा देण्याची सूचना पालकमंत्री भुसे यांनी केली.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com