रुग्णांची वाढती संख्या चिंताजनक

रुग्णांची वाढती संख्या चिंताजनक

पिंपळगाव ब. । वार्ताहर Pimpalgaon Baswant

निफाड तालुका (Niphad Taluka) हा आधीपासूनच करोनाचा (corona) हॉटस्पॉट (hotspot) राहिला आहे. पहिल्या व दुसर्‍या लाटेत हा तालुका अग्रस्थानी होता. आता देखील करोना बाधितांची (corona paitent) संख्या वाढतच असून ती चिंताजनक बाब आहे.

तालुक्यातील ओझर (ozer), पिंपळगाव बसवंत (pimpalgaon baswant), चांदोरी (chandori) आदी भागात करोना पुन्हा डोके वर काढत असुन सध्या सरकारी रुग्णालयातील (Government Hospital) करोना बाधीतांचा आकडा 147 वर गेला आहे. खासगी दवाखान्यात दाखल झालेल्या रुग्णांची संख्या मात्र मोठी असून अनेक रुग्ण घरीच ऊपचार घेत आहे. त्यामुळे त्यांची माहिती मिळत नाही. पिंपळगाव बसवंत व परीसरात जवळपास तीनशे च्या आसपास करोना संसर्गामुळे मृत्यू झाले आहे.

असे असतांनाही अद्याप देखील नागरिक करोना नियमांचे पालन (Adherence to the Corona Rules) करतांना दिसत नाही. अद्यापही शहरात काही तरूण सुपरमॅन सारखे फिरतांना दिसत असून काहिंनी लसीचे दोन डोस घेतल्यावरही त्यांना जणू आपण अमर झाल्यासारखे वाटत आहे. मागील वर्षी करोना प्रादूर्भावामुळे संपूर्ण तालुका हादरला होता. त्यामुळे 2021 वर्ष हे कधीही न विसरणारे वर्ष ठरले आहे. आता देखील त्याची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी सर्वांनी करोनाचे नियम पाळणे गरजेचे आहे.

नियमांचे पालन केल्यास करोनावर मात परिस्थिती गंभीर होण्यास आपण आमंत्रण देत आहेत. नियमांची पायमल्ली होत असून नागरिकांचे लसीकरण बाकी असल्यास त्यांनी त्वरीत लसीकरण करून घ्यावे. त्यासाठी शासकीय यंत्रणा सज्ज आहे. निफाड तालुक्यात करोना पुन्हा एकदा डोके वर काढत असून नियमांचे पालन केल्यास आपण त्यावर निश्चित मात करू शकतो.

डॉ.चेतन काळे, कोविड नोडल अधिकारी (निफाड)

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com