ग्रामपंचायत निवडणुकीची धामधूम

ग्रामपंचायत
ग्रामपंचायत

येवला । Yeola (प्रतिनिधी)

तालुक्यातील ज्या गावांच्या ग्रामपंचायतीच्या सरपंच, सदस्य पदाचा कालावधी पूर्ण झाला आहे, अशा ग्रामपंचायतींच्या निवडणुका केव्हा एकदा जाहीर होतात, याकडे गाव पुढार्‍यांचे लक्ष लागून होते.

मात्र गुरुवारी निवडणूक आयोगाने राज्यासह तालुक्यातील सुमारे 69 ग्रामपंचायतीचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केल्याने गाव पुढारी कामाला लागले आहेत.

प्रारुप मतदार याद्या प्रसिद्ध केल्यानंतर विधानसभा निवडणुकीची मतदारयादी ग्राह्य धरली, पण ग्रामपंचायतीच्या आगामी पंचवार्षिक निवडणुकीसाठी तयार करण्यात आलेल्या मतदार याद्यांमध्ये हद्दीबाहेरील मतदारांची नावे आल्याचे प्रकार घडले आहेत.

याबाबत तक्रारी झाल्याने ग्रामपंचायतीच्या हद्दीबाहेरील मतदारांची नावे तत्काळ हटवण्याचे आदेश राज्य निवडणूक आयोगाने दिले आहेत. यामुळे ग्रामपंचायतींच्या मतदार याद्या शुद्ध झाल्या आहेत.

जिल्ह्यातील 621 ग्रामपंचायतींसह राज्यभरातील 14 हजार 235 ग्रामपंचायतींच्या पंचवार्षिक निवडणुका पुढील वर्षीच्या सुरुवातीला म्हणजेच 15 जानेवारीला होणार आहेत.

या निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाने प्रसिद्ध केलेल्या मतदारयाद्यांचा फटका अनेक ग्रामपंचायतींना बसल्याने मतदार याद्या दुरूस्तीबद्दल हरकतींसह जिल्हाधिकारी कार्यालयाबरोबरच निवडणूक आयोगाकडे धाव घेतली होती. यावर निवडणूक आयोगाने आदेश दिल्याने आता याद्या सुधारित होणार आहेत.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com