उमेदवारांची प्रचारासाठी धावपळ

उमेदवारांची प्रचारासाठी धावपळ

पालखेड बं. । बापू चव्हाण Dindori

गेल्या काही दिवसांपासून दिंडोरी तालुक्यात ग्रामपंचायतीच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून त्यामध्ये सात ग्रामपंचायतीच्या निवडणुका बिनविरोध झाल्या.

मागीलवर्षी करोना संसर्गामुळे विविध क्षेत्रातील पंचवार्षिक निवडणूक लांबणीवर पडल्या होत्या. परंतु ऑगस्ट-सप्टेंबर क करोनाचे वातावरण पुर्ण पदावर येऊ लागल्याने निवडणूक आयोगाच्या वतीने पंचायत राज संस्थांच्या निवडणुका डिसेंबरमध्ये जाहीर करण्यात आल्या. त्यामुळे सध्या राज्यातील अनेक ग्रामपंचायतीचा निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. साडेपाच वर्षे प्रतीक्षा केलेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुका जाहीर झाल्याने निवडणूक लढविणार्‍या उमेदवारांनी तयारी सुरू केली आहे.

अनेक गावांमध्ये चुरशीच्या निवडणुका होणार आहे. अनेक ठिकाणी यावेळेस तरुणाईला प्राधान्य देण्याचे प्रयत्न केले आहे. त्यामुळे अधिकाधिक ग्रामपंचायतीमध्ये तरुणांमध्येच निवडणुकीची लढाई होत असल्याचे दिसत आहे. तालुक्यामध्ये या निवडणुकीला 15 जानेवारी रोजी मतदान प्रक्रिया राबवली जाणार आहे. अनेक ठिकाणी राजकीय पुढार्‍यांची प्रतिष्ठा पणाला लागली असून राजकीय नेते आपल्या गटाची सत्ता यावी म्हणून समझोता करण्याचा प्रयत्न करत आहे. एरवी लोकसभा विधानसभा पंचायत समिती जिल्हा परिषद नगरपंचायत निवडणुकीत एका गटाने एका राजकीय पक्षाच्या पाठीशी उभे राहून साथ देणारे सध्या निवडणूक लढवून परस्पर विरोधी निवडणुकीसाठी उभे राहिले आहे. त्यामुळे गावागावात चौका-चौकात मध्यवर्ती ठिकाणी उमेदवारांची प्रचाराचे बॅनर दिसत आहे.

नाते गोते आर्थिक हित संबंध गण गोत्र यामध्ये गाव पातळीवरची निवडणूक होत असल्याने प्रत्येक मतदार आपल्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी प्रयत्नशील आहे. गेल्या दोन दिवसापासून उमेदवाराच्या प्रचाराचा शुभारंभ झाला असून गृहभेटी शिवार भेटी वस्ती वाडी यावर प्रचाराचा भर अवलंबून असून मतदारांच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी उमेदवार प्रयत्नशील आहे. याशिवाय निवडणुकीमुळे अनेक व्यवसायांना तेजी येत असून आर्थिक उलाढाल होत असल्याचे पहावयास मिळत आहे. सकाळच्या वेळी गावोगावी चहा पिण्यासाठी मोठी गर्दी होत असल्याने दिवसोंदिवस निवडणुकीमध्ये रंगत वाढत चालली आहे. करोनामुळे चार ते पाच महिने बंद असलेल्या हॉटेल व्यवसायाला यामुळे सुगीचे दिवस येत आहे.

मतदार याद्या बनवणे प्रचार पत्रके बनवणे यामुळे झेरॉक्स व्यवसाय पण तेजीत आली आहे. याशिवाय अनेक तरुण बॅनर व्यवसायाकडे वळताना दिसत आहे. सध्या आकडेमोडीची गणिते सुरू झाले आहे. एक मत मिळवण्यासाठी उमेदवारांमध्ये प्रयत्नांची पराकाष्ठा सुरू झाली आहे. शेतीच्या कामांचा सीजन असूनही ज्येष्ठ व युवक कार्यकर्ते तन-मन-धनाने गावांमध्ये थांबून आपल्या उमेदवाराच्या प्रचारात भाग घेत आहे. निवडणुकीमुळे मध्यवर्ती चौकामध्ये होणार्‍या मोठ्या प्रमाणात गर्दी मुळे ग्रामीण भागातील वातावरण ढवळून निघाले आहे.

गेल्या तीन ते चार दिवसापासून तालुक्यामध्ये अवकाळी पावसाने कहर केला असल्याने द्राक्ष पंढरी म्हणून ओळखल्या जाणारे या तालुक्यात शेतकर्‍यांची द्राक्ष पिकांची मोठ्या प्रमाणात हानी झाली आहे. मात्र एका बाजूला निवडणुका आणि दुसर्‍या बाजूला आर्थिक नुस्कान मात्र अजूनही याबाबत तालुक्यातील नेत्यांना याचे साधे सोयरसुतक निवडणुका येतील जातील पण पुढे काय असा प्रश्न सध्या शेतकर्‍यांना भेडसावत असल्याने शेतकरी वर्गामध्ये नाराजी आहे. कधी पंचनामे होतील व कधी नुसकान भरपाई मिळेल हे मात्र सांगणे कठीण आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com