चहाच्या गोडव्यातून जिंकले ग्रामपंचायतीचे रण

बेलतगव्हाणच्या आकाशने ठोकली मतांची डबल सेच्युरी
चहाच्या गोडव्यातून जिंकले ग्रामपंचायतीचे रण

नाशिक । प्रतिनिधी Nashik

चहावाला या देशाचा पंतप्रधान बनू शकतो तर मी ग्रामपंचायत सदस्य का नाही, असे म्हणत चहाची टपरी चालवणारा आकाश पागेरे हा युवक निवडणुकीच्या रिंगणात उतरला. निवडणुकीत जोेरदार मलक्ष्मीदर्शन होत असताना आकाश याने अनेक वर्षापासून लोकांना चहाच्या दिलेल्या गोडव्यातुन ग्रामपंचायतीचे रण जिंकले.

बेलतगव्हाण ग्रामपंचायतीत मतांची डबल सेंच्युरी ठोकत तो सदस्य म्हणून निवडूण आला. त्यामुळे सध्या गावात तो चर्चेचा विषय ठरले असून त्यांच्या टपरीवर चहाचा झुरका घेण्यासाठी गर्दी होत आहे.

ग्रामपंचायत निवडणुकीत उमेदवारांनी प्रचाराचा धुराडा उडवला होता. सोशल मीडियाच्या माध्यमातून ताई, माई, आक्का माझ्या नावावरच मारा विजयाचा शिक्का अशी साद उमेदवारांकडून घातली जात होती. मतांसाठी जोरदार घोडेबाजार सुरु होता. मात्र, पुर्वी चहाची टपरी हाच सोशल मीडिया होता. या ठिकाणी गावातले लोक चहापिण्यासाठी जमायचे.

चहा सोबत गप्पांचा फड रंगायचा व गावातली बित्तम बातमी येथे मिळायची. या फंडाच्या तरुण तुर्क आकाश पागेरे यांने पुरेपुर वापर केला. घरची परिस्थिती बेताची असल्याने लहानपणापासुनच तो चहाच्या टपरीवर वडिलांना मदत करायचा. त्यांच्या टपरीवर चहाचा आस्वाद घेयला लोकांची गर्दी व्हायची. त्यामाध्यमातून त्यांने दांडगा जनसंपर्क निर्माण केला. सोबतीला चहाचा गोडवा होताच. एकीकडे मतदानासाठी हजारो रुपये वाटले जात असताना फक्त चहाच्या गोडव्यावर विरोधकांना निवडणुकीत त्यांने पाणी पाजले.

तब्बल 245 मतदान घेउन त्याने यांनी विजयाचा गुलाल उधळला. त्यामुळे त्यांची जोरदार चर्चा गावात रंगत आहे. ग्रामपंचायत सदस्य झालो तरी चहाच्या गोडव्यासोबतच गावाचा विकासासाठी आपण कटिबध्द असल्याचे आकाश सांगतो.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com