देवळालीच्या विकासासाठी शासन कटीबद्ध

जलसंपदा मंत्री तथा राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे प्रतिपादन
देवळालीच्या विकासासाठी शासन कटीबद्ध

देवळाली कॅम्प । वार्ताहर Deolali Camp

मतदारसंघासह विधिमंडळातही आमदार सरोज आहिरे (MLA Saroj Ahire) यांचे कामकाज गौरवास्पद असून देवळालीच्या (Deolali Camp) विकासासाठी राज्य शासन जास्तीत जास्त निधी (Fund) उपलब्ध करून देणार असल्याचे प्रतिपादन जलसंपदा मंत्री तथा राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Water Resources Minister and NCP State President Jayant Patil) यांनी केले.

देवळाली विधानसभा मतदारसंघातील (Deolali Assembly constituency) कॅन्टोन्मेंटच्या आठही वॉर्डातील विकास कामांसाठी आ. आहिरेनी राज्य शासनाने उपलब्ध करून दिलेल्या पाच कोटी रुपये खर्चाच्या विकास कामांचा शुभारंभ पाटील यांच्या हस्ते झाला. त्यावेळी ते बोलत होते.

व्यासपीठावर खासदार हेमंत गोडसे (MP Hemant Godse), आ. सरोज आहिरे, आ. माणिकराव कोकाटे (MLA Manikrao Kokate), आ. दिलीप बनकर (MLA Dilip Bankar), माजी खासदार देवीदास पिंगळे (Former MP Devidas Pingale), कॅन्टोन्मेंट बोर्डाचे (Cantonment Board) मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राहुल गजभिये, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष कोंडाजी आव्हाड, निवृत्ती अरिंगळे, सचिन पिंगळे, नानासाहेब महाले, देवळाली विधानसभा अध्यक्ष सोमनाथ बोराडे, सोमनाथ खातळे, एन.डी. गोडसे, संजय गीज, बाळासाहेब मस्के, रवींद्र धुर्जड आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी पाटील यांनी कॅन्टोन्मेंट बोर्डाकडे होणारे दुर्लक्ष व त्यामुळे थांबलेला विकास यासाठी राज्य शासनाने सातही कॅन्टोन्मेंट बोर्डांना विकासासाठी निधी देण्याचे धोरण ठरवले असून पहिले काम देवळालीत सुरू होत असल्याचे सांगून आ. आहिरे यांच्या प्रयत्नातून आज 5 कोटीचा निधी मिळाला असला तरी भविष्यात अर्थमंत्र्यांच्या माध्यमातून मोठा निधी येथे उपलब्ध होऊ शकतो.

राज्य शासनाला अस्थिर करण्याचा डाव भाजपाकडून (BJP) होत असल्याचा आरोप करताना इडी (ED) सीबीआयच्या (CBI) माध्यमातून मंत्र्यांना बदनाम करण्याचे षडयंत्र सुरू आहे. मात्र कारगील युद्धातील (Kargil War) शवपेट्यांमध्येही भ्रष्टाचार करणार्‍यांनी आम्हाला नितीमत्तेचे धडे देऊ नये, असा इशाराही त्यांनी दिला. खा. हेमंत गोडसे यांचे काम लोकाभिमुख व कौतुकास्पद असल्याचे सांगितले.

खा. गोडसे यांनी स्वतंत्र मिळाल्यापासून देशातील 62 कॅन्टोन्मेंट बोर्डांना कधीही शासनाचा निधी मिळत नव्हता तो मिळावा म्हणून आपण केंद्र व राज्य सरकारकडे 2016 पासून केलेले प्रयत्न फळास आले आहेत. कोविडच्या काळात निधी उपलब्ध न झाल्यामुळे कामे प्रलंबित होती. ती आज होत आहे ही चांगली बाब आहे. मात्र या विकासाचे झाड शिवसेनेने (Shiv Sena) लावले असून त्याचे फळ मात्र राष्ट्रवादी घेऊ पहात असल्याचा टोला त्यांनी मारला.

प्रास्ताविकातून आ. आहिरे यांनी पहिल्यांदा राज्य शासनाने विकासासाठी पाच कोटीचा निधी दिला आहे. जिल्हा नियोजन मंडळाचा निधी देखील मिळू शकतो यासाठी कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या प्रतिनिधीला नियोजन मंडळात स्थान असावे. शिवाय देवळाली कॅम्पच्या पाणीपुरवठ्यासाठी स्वतंत्र बंधारा व्हावा, लॅमरोडच्या नूतनीकरणासाठी दिलेले पाच कोटी तातडीने मिळून त्याचा शुभारंभ लवकरच होण्याची अपेक्षा बोलून दाखवली.

सूत्रसंचालन सीमा पेठेकर तर आभार राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अ‍ॅड. बाळासाहेब आडके यांनी मानले. कार्यक्रमास बोर्डाचे माजी उपाध्यक्ष बळवंतराव गोडसे, तानाजी करंजकर, दिनकर पाळदे, अ‍ॅड. सुभाष हारक, अ‍ॅड. संजय ठाकूर, नितीन गायकवाड, सायरा शेख, अर्चना पारचा, राजेंद्र जाधव, बबनराव कांगणे, शामराव कदम, रवींद्र भदाणे, विनोद सारस, सागर गोडसे, प्रशांत बच्छाव, गिरीश धूर्जड, सोनू रामवानी, पोपटराव हारक, मधुकर हारक, श्रीधर धुर्जड, चंद्रकांत माळी आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Stories

No stories found.