राष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धेत महाराष्ट्राची दमदार कामगिरी

राष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धेत महाराष्ट्राची दमदार कामगिरी

नाशिक । प्रतिनिधी | Nashik

इंडिया तायक्वांदो (India Taekwondo) आणि तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र (Taekwondo Association of Maharashtra) यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धेचे (National Taekwondo Tournament) उद्घाटन आज झाले. तीन दिवस चालणार्‍या या स्पर्धेमध्ये संपूर्ण भारतामधून सात झोनच्या 800 खेळाडूंनी सहभाग घेतला आहे.

या स्पर्धेतील विजेते खेळाडू जागतिक तायक्वांदो स्पर्धेमध्ये (World Taekwondo Championships) भारताचे प्रतिनिधित्व करतील. या स्पर्धेमध्ये आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय स्तरावर पदके मिळविलेले अनेक स्पर्धक सहभागी झाल्यामुळे या स्पर्धेला एक वेगळीच रंगत येणार असून प्रत्येक खेळाडू निवड होण्यासाठी आपले नशीब आजमावत आहेत.

उद्घाटनानंतर खेळल्या गेलेल्या विविध गटांच्या स्पर्धामध्ये हरयाणाच्या खेळाडूंनी सुंदर खेळाचे प्रदर्शन करून सुवर्णपदके पटकावली, तर राजस्थान (Rajasthan), दिल्ली (Delhi) केरळच्या (Kerala) खेळाडूंनीही चांगला खेळ करून सुवर्णपदक (gold medal) मिळविले.

प्रमुख पाहुणे म्हणून विशेष पोलीस महानिरीक्षक शेखर पाटील (Special Inspector General of Police Shekhar Patil), महंत सुधीर महाराज, जागतिक तायक्वांदो आणि इंडिया तायक्वांदोचे समन्वयक कैराश बेहरी (इराण), भारतीय तायक्वांदोचे अध्यक्ष आणि महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचे सचिव नामदेव शिरगावकर महाराष्ट्र तायक्वांदो असोसिएशनचे अध्यक्ष अनिल झोडगे, महाराष्ट्र तायक्वांदो असोसिएशनचे महासचिव संदीप ओंबासे,

सॉफ्ट टेनिस असोसिएशन ऑफ महाराष्ट्रचे अध्यक्ष सुनील पूर्णपात्रे, मॉर्डन पेंट्याथलॉन महाराष्ट्राचे अध्यक्ष बिपिन सूर्यवंशी आदी मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये हा उदघाटन सोहळा पार पडला.

निकाल

मुले : 54 किलो - 1) अमर कुमार ( हरयाणा) - सुवर्ण, 2) तेजस सांगवान (महाराष्ट्र )- रौप्य, 3) अर्पित (कर्नाटक) आणि कुशल अमान(गुजरात) -संयुक्त कास्य.

63 किलो - 1) अजय कुमार (हरयाणा) - सुवर्ण, 2) सौरव शर्मा (हरयाणा )- रौप्य, 3) परमजीत (हरयाणा ) आणि दिनेश (मध्य प्रदेश) -संयुक्त कास्य.

74 किलो - 1) शिवांश (दिल्ली) - सुवर्ण, 2) जर्नल सिंग (राजस्थान) - रौप्य, 3) दिनेश (हरयाणा) आणि पुष्पक महाजन (महाराष्ट्र ) -संयुक्त कास्य.

मुली : 49 किलो - 1) दीपाशा शर्मा (हरयाणा) - सुवर्ण, 2) लॅशीराम थोम्बी (केरळ)- रौप्य, 3) मृणाल देव (महाराष्ट्र ) आणि अनिशा (उत्तर प्रदेश) -संयुक्त कास्य.

67 किलो - 1) मार्गरेट (केरळ) - सुवर्ण, 2) इतिषा दास (चंदीगड)- रौप्य, 3) हर्षा सोंधी (चंदीगड) आणि हर्षाली (तामिळनाडु ) -संयुक्त कास्य.

57 किलो - 1) काशिका मलिक (हरयाणा) - सुवर्ण,2) विपुला खरे (महाराष्ट्र)- रौप्य, 3) काव्या (तामिळनाडू) आणि सोनामिका (आसाम) -संयुक्त कास्य.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com