
नाशिकरोड | प्रतिनिधी | Nashik Road
येथील गोरेवाडी परिसरात (Gorewadi area) चार जणांच्या एका टोळक्याने महिलेच्या घरात घुसून घरातील साहित्याची व सामानाची मोठ्या प्रमाणात तोडफोड (Sabotage) करून नुकसान केले. तसेच बाहेर उभ्या असलेल्या रिक्षाची तोडफोड करत सदर टोळके फरार झाले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, राखी लवेश कदम राहणार चांदेकर दुकानासमोर गोरेवाडी नाशिक रोड या महिलेने नाशिकरोड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. छकुल्या वाघमारे व त्याचे इतर तीन साथीदार कदम यांच्या घरात घुसले व त्यांनी घरातील पंखा फ्रिज टीव्ही बाथरूमच्या दरवाजाचे दारे खिडक्या यांची दांडुक्याच्या साहाय्याने तोडफोड करून मोठ्या प्रमाणात नुकसान केले. त्यानंतर बाहेर येऊन घरासमोर पार्क केलेल्या रिक्षाची (Rickshaw) काच फोडून त्याची तोडफोड करत हे टोळके फरार झाले.
दरम्यान या घटनेनंतर राखी कदम यांनी नाशिकरोड पोलीस ठाण्यात (Nashik Road Police Station) तक्रार दाखल केली असून छकुल्या वाघमारे व इतर तीन जणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच याप्रकरणी पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शिंदे (Anil Shinde) यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.