उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद

सुरगाणा नगरपंचायतींसाठी 75 टक्के तर कळवणला 74 टक्के मतदान
उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद

सुरगाणा | प्रतिनिधी Surgana

सुरगाणा नगरपंचायतीच्या (Surgana Nagar Panchayat) 17 मतदान केंद्रांवर (Polling Station) सायंकाळी वाजेपर्यत 75.50% मतदान (voting) शांततेत झाले आहे. एकूण मतदान-4212 होते. यामध्ये पुरुष- 2047, स्त्री- 2165 होत्या.

यापैकी झालेले मतदान- 3180 असून पैकी 1592 पुरुषांनी तर 1588 महिला मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. सर्वच मतदान केंद्रांवर कोणत्याही प्रकारचे गालबोट न लागता मतदान शांततेत पार पडले. जिल्हा परिषद शाळा (Zilha Parishad School) सुरगाणा (surgana) नं.1 येथील केंद्रावर वयोवृद्ध महिलां उर्मिला भिवाजी चौधरी यांनी मतदानाचा हक्क (Right to vote) बजावला. तर प्रथमच सुरगाणा नगरपंचायत निवडणुकीत श्रीमंत रोहित राजे पवार देशमुख तसेच श्रीमंत सोनाली राजे पवार, रत्नशीलराजे पवार यांनी मतदानाचा हक्क बजावला.

मतदान झोनल अधिकारी एस.के.वाघ (Polling Zonal Officer SK Wagh), आर. टी. मोरे, ऋषिकेश गरुड, चंद्रकांत थविल यांनी काम पाहिले. मतदान कामी बागलाण (baglan) चे उपजिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी बबनराव काकडे (Returning Officer Babanrao Kakade), तहसिलदार कैलास पवार (Tehsildar Kailas Pawar), नायब तहसिलदार राजेंद्र जाधव, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी संजय जाधव, विजय जाधव सह नगरपंचायत तसेच महसूल विभाग, शिक्षण विभागाचे नरेंद्र कचवे, दिलीप नाईकवाडे, रतन चौधरी, सुधाकर भोये, चंदर चौधरी आदिंसह विविध खात्यांचे कर्मचारी सहभागी झाले होते.

नाशिक ग्रामीणचे अप्पर पोलीस अधीक्षक माधुरी केदार कांगणे, उपविभागीय पोलिस अधिकारी कळवणचे अमोल गायकवाड, पोलिस निरीक्षक संदीप कोळी, सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश बोडके, सागर नांद्रे, बार्‍हे पोलिस निरीक्षक प्रमोद वाघ, वणी येथील स्वप्निल रजपूत, चंद्रकांत दवंगे आदिंची मतदान केंद्रांवर चोख बंदोबस्त ठेवला होता.

कळवणला 74 टक्के मतदान

कळवण (kalwan) नगरपंचायत निवडणूकीसाठी (nagar panchayat election) 14 जागांसाठी 39 उमेदवार रिंगणात होते. 14 मतदानकेंद्रांवर मतदान झाले. यात 12 हजार 406 मतदारांपैकी 9 हजार 196 मतदारांनी हक्क बजावला असल्याची माहिती निवडणूक निर्णय तथा सहाय्यक जिल्हाधिकारी अधिकारी विकास मीना व सहाय्यक निवडणूक अधिकारी सचिन पटेल यांनी दिली. कळवण नगरपंचायतीच्या 17 जागांसाठी निवडणूक होती.

पैकी प्रभाग क्रमांक 11 व 12 हे ओबीसी राखीव असल्याने येथील निवडणूक स्थगित करण्यात आली आहे. तर प्रभाग क्रमांक 7 मधून राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुनीता कौतिक पगार ह्या बिनविरोध निवडून आल्या आहेत, उर्वरित 14 जागांसाठी 39 उमेदवार निवडणूक रिंगणात होते. त्यांचे नशीब आज 21 डिसेंबर रोजी सकाळी 7 30 ते 5.30 या वेळेत मतपेटीत बंद झाले आहे. यात 9 हजार 196 मतदारांनी आपला हक्क बजावला आहे. सर्वच मतदान केंद्रांवर मतदारांनी गर्दी केली होती.

सकाळी थंडी (cold) असल्याने मतदानाचा टक्का कमी होता. परंतु 9 वाजे नंतर मतदारांनी उत्स्फुर्त प्रतिसाद दिल्याने सायंकाळी मतदान संपेपर्यंत 74. 2 टक्के मतदान झाले. काही ठिकाणी किरकोळ शाब्दिक चकमक वगळता सर्वत्र शांतते मतदान प्रक्रिया पार पडली. झालेल्या मतदानाच्या टक्केवारीमुळे अनेक ठिकाणचे निकाल धक्कदायक लागण्याची शक्यता आहे.

पेठमध्ये 80 टक्के मतदान

पेठ नगरपंचायतीच्या 17 जागांसाठी झालेल्या पंचवार्षीक निवडणूकीत एकुण 4636 मतदार आहे. एकुण 80 : 63 % मतदान झाले. सर्वाधीक मतदान प्रभाग क्रमांक 10 मध्ये 88 : 24 तर प्रभाग क्रमांक 14 मध्ये 88 : 54 सर्वात कमी मतदान प्रभाग क्र. 5 मध्ये 70: 48% नोंदविण्यात आली.

प्रभाग निहाय झालेले मतदान पुढीलप्रमाणे

प्रभाग क्रमांक 1 - 763 पैकी 592, प्रभाग क्रमांक 2- 1050 पैकी 822, प्रभाग क्रमांक - 3 - 727 पैकी 474, प्रभाग क्रमांक 4 - 1169 पैकी 920, प्रभाग क्रमांक 5- 1018 पैकी 809, प्रभाग क्रमांक 6- 731 पैकी 473, प्रभाग क्रमांक 8- 658 पैकी 554, प्रभाग क्रमांक -9 - 1026 पैकी 768, प्रभाग क्रमांक 10 - 782 पैकी 597, प्रभाग क्रमांक 13 - 1050 पैकी 678, प्रभाग क्रमांक 14 - 776 पैकी 561 , प्रभाग क्रमांक 15 - 1011 पैकी 779, प्रभाग क्रमांक - 16 - 856 पैकी 513, प्रभाग क्रमांक - 17 - 789 पैकी 656 आदी.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com