भिवतास धबधबा पर्यटन विकासाला मिळणार चालना

वन विभाग अधिकाऱ्यांनी केली पाहणी
भिवतास धबधबा पर्यटन विकासाला मिळणार चालना
भिवतास धबधबा

दिंडोरी | Dindori

सुरगाणा तालुक्यातील भिवतास धबधबा हे पर्यटन स्थळ म्हणून करण्यासाठी वनविभागाने हालचाली सुरु केल्या असून ग्रामस्थांच्या सहकार्याने येथे लवकरच बदल करण्यात येणार आहे. या निमित्ताने सर्व वनविभागाच्या वरिष्ठ अधिकार्‍यांनी भिवतास धबधब्यासह सर्व भागाना भेटी दिल्या आहे. पर्यटन स्थळ विकसित झाल्यास ग्रामस्थांना सुध्दा रोजगारांच्या संधी उपलब्ध होणार आहे.

भिवतास हे ठिकाण सुरगाणा तालुक्यातील केळवण, खोकरविहीर, अबोडा पसिसरात आहे. येथे नदीच्या पाण्यातून ढसळणारा धबधबा असून हा धबधबा सुमारे १००० फुट खोल खाली कोसळतो. परिसरात निसर्ग रम्य वातावरण असल्याने प्रसन्न वाटते. त्यामुळे येथे गुजरात आणि महाराष्ट्रातील अनेक पर्यटक भेटी देत असतात. असे असले तरी हा धबधबा पर्यटकांसाठी सुरक्षित नाही.

धबधब्याच्या दोन्ही बाजुंना प्रचंड दरी आहे. त्यामुळे जर एखादयाचा तोल गेला तर त्यास वाचवणे अशक्यच आहे. परंतु जर येथे सुरक्षितता पुरवुन अधिक सोयी सुुविधा दिल्या तर पर्यटकांचा ओढा अजुन वाढु शकतो. या भागातील नागलीची भाकरी आवडीने बाहेरुन येणारे पर्यटक खातात. आदिवासी भागातील जेवणावळीकडे शहरातील पर्यटकांचा कल असतो. पर्यटनाच्या निमित्ताने येथे हॉटेल व्यवसाय बहरु शकतो. या पार्श्‍वभुमीवर अनेक दिवसांपासुन सामाजिक कार्यकर्त्यांची पर्यटन स्थळ विकासाबाबत मागणी आहे. सन २००५ साली देशदुतने सर्वप्रथम याभागातील पर्यटनाची मागणी केली होती. त्यानंतर तत्कालीन लोकप्रतिनिधी माजी मंत्री ए.टी.पवार यांनी रस्त्याचा प्रश्‍न मार्गी लावला होता.आता या भागात त्यानंतर कोणतेही ठोस काम झाले नाही. आता सामाजिक कार्यकत्याची मागणी  वाढत चालली आहे.

देविदास कामडी यांनी याबाबत वनविभागाचे अधिकारी एस.व्ही. गवारी याच्याकडे आदिवासी भागाची व्यथा मांडली. त्यांच्या सल्लयानुसार जागा मालक रमेश चौधरी यांच्यांशी चर्चा केली. त्यांनी विकासात्मक दृष्टीकोन दाखवला. त्यानंतर या भागात भा.व.से. पंकज गर्गे,  श्री.आनंद रेड्डी, श्रीमती श्‍वेता, श्री.नितीनकुमार सिंग, वन परिक्षेत्र अधिकारी  सुरेश गवारी आदींनी येथे भेट दिली. भिवदेव, पाराबती, बैल, औत, आळवट आदी सर्व ठिकाणांची पहाणी केली. परेटी, बेलीचा पाबर हा डोह बघितला. नदीतील दगड वापरुनच येथे पर्यटनाला चालना देता येईल व सौदयर्ं टिकेल असा विचार त्यांनी केला असुन त्याबाबत कारवाई करण्याचे निर्देश दिले.

यांवेळी अंबोडा  ग्रामपंचायतीचे सरपंच योगीराज पवार, हंसराज गावित, हनुमंत बागुल, कौशिक गावित, कैलास चौधरी, उपसरपंच लक्ष्मण पाडवी, विजय चौधरी, पोलिस पाटील भाऊराव चौधरी, देविदास पाडवी, महादेव जाधव, मनोहर गवळी, योगेश गवळी, दत्तु निकुळे , रामदास वार्डे आदी उपस्थित होते. अधिकार्‍यांच्या भेटीनंतर येथे पर्यटनस्थळ विकास आराखड्याला अंतिम रुप देण्यास सुरुवात झाली आहे. पर्यटन विकास आराखडा तयार करण्याचे काम प्रगतीपथावर असून पुर्ण होताच शासन दरबारी अहवाल सादर करण्यात येईल अशी माहिती वन अधिकारी सुरेश गवारी यांनी दिली.

भिवतास परिसराचा विकास व्हावा अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासुन स्थानिक जनतेची आहे.दैनिक देशदूतच्या माध्यमातून अनेक वेळा हा प्रश्न मांडण्यात आला होता.

याबाबत बार्‍हे परिक्षेत्राचे वन अधिकारी एस.व्ही. गवारी याच्याकडे हा प्रश्‍न मांडला. कारण या भागात अनेक जमिनी वनविभागाच्याही ताब्यात असुन पयर्ंटनाला वनविभागाची साथ मिळणार आहे. वनविभागाच्या अधिकार्‍यांनी भेटी दिल्याने आमच्या आशा पल्लवित झाल्या असुन पर्यटनस्थळाचा विकास झाल्यास आदिवासी भागातील तरुणांना रोजगार मिळणार अांहे.

- देविदास कामडी,सामाजिक कार्यकर्ते

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com