'त्या' हत्या प्रकरणातील फरार आरोपी पोलिसांच्या ताब्यात

'त्या' हत्या प्रकरणातील फरार आरोपी पोलिसांच्या ताब्यात

नाशिक | प्रतिनीधी | Nashik

अंबड औद्योगिक वसाहतीतील रोहिणी पावडर कोटिंग कंपनीचे (Rohini Powder Coating Company) सीईओ योगेश मोगरे यांच्या हत्या प्रकरणात मागिल आठवड्यात पोलिसांनी एका अल्पवीन संशयिताला हरियाणातून ताब्यात घेतले होते; तर फरारी असलेला दुसरा प्रमुख संशयित अजितसिंग सत्यवान लठवाल (२४ रा. चुडाना, हरीयाणा) यालाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

नाशिक शहर गुन्हे शाखेच्या (Nashik City Crime Branch) गुंड विरोधी पथकाने ही कारवाई केली आहे. 23 मार्च रोजी योगेश मोगरे यांच्या हत्त्येची घटना मुंबई हायवे लगत फाळके स्मारक जवळ झाली होती.

'त्या' हत्या प्रकरणातील फरार आरोपी पोलिसांच्या ताब्यात
IPLवर कोरोनाचे सावट; 'या' दिग्गजाचा रिपोर्ट कोरोना पॉझिटीव्ह

दुसरा संशयित लठवाल ओळख लपविण्यासाठी दाढी व केस कापून वेशांतर करून जंगलात लपला होता. पोलिसांनी सापळा रचून त्याला सोमवारी हरियाणातून (Haryana) ताब्यात घेतले.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा...

गुन्हे शाखेचे सहा पथके स्थापन करून हल्लेखोरांच्या मागावर पोलीस होते. या पथकांनी घटनास्थळावर साक्षीदाराने सांगितलेल्या वर्णनाप्रमाणे सर्व मार्गावरील सीसीटीव्ही फुटेज तपासून आरोपींच्या शरीरयष्टीबाबत माहिती घेत दुसऱ्या संशयिताला पाडण्यात यश मिळवले आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com