विहिरीत पडलेल्या कोल्ह्याला मिळाला जीवदान

विहिरीत पडलेल्या कोल्ह्याला मिळाला जीवदान

वरवंडी । वार्ताहर | Varvandi

दिंडोरी तालुक्यामध्ये (dindori taluka) सध्या खूपच उष्ण वातावरण (Hot climate) असल्याकारणाने माणसांबरोबर प्राणीमात्रावर देखील या उष्णतेचा परिणाम होत आहे. अनेक भागांमध्ये विहीरी (Well), बोअरवेल आटल्याने तसेच जंगलामध्ये (frorest) पाण्याची तुटवडा असल्याने जंगली प्राणी पूर्णतः मानव वस्तीकडे वळत आहे.

अशातच जानोरी (jamori) येथे पाण्याच्या शोधात निघालेला एक कोल्हा विहिरीत पाणी पिण्याच्या नादात रात्रीच्या सुमारास विहिरीत पडल्याची घटना घडली. ही घटना जानोरी येथील शेतकरी (farmer) जगन्नाथ वाघ यांच्या शेतामध्ये असलेल्या विहिरीत कोल्हा (Fox) पडल्याच त्यांच्या लक्षात येताच त्यांनी तात्काळ वन विभागाच्या (Forest Department) अधिकार्‍यांना पाचारण केले.

वन विभागाचे कर्मचारी त्या ठिकाणी दाखल झाले. कर्मचारी चंद्रकांत जाधव यांनी या कोल्ह्याची परिस्थिती बघून स्वतः विहिरीत उतरून नेटच्या साह्याने कोल्ह्याला पकडून सुखरूप बाहेर काढले. हा कोल्हा रात्रभर पाण्यात भिजून पूर्ण घाबरून गेलेला होता. त्यामुळे वरती काढताच काही सेकंदातच कोल्ह्यानी धूम ठोकून डीआरडी ओच्या जंगलाच्या दिशेने कूच केली.

Related Stories

No stories found.