माध्यमांच्या प्रगल्भतेवर लोकशाहीचा पाया

निवृत्त सनदी अधिकारी महेश झगडे
माध्यमांच्या  प्रगल्भतेवर लोकशाहीचा पाया

नाशिक । प्रतिनिधी Nashik

पत्रकारांनी Journilist जनतेच्या मूलभूत प्रश्नांचा अभ्यास करून प्रशासनाला निर्भीडपणे ज्वलंत प्रश्न विचारावेत. त्यातून प्रशासकीय यंत्रणांना कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी धाक निर्माण होईल. लोकशाहीचा democracy चौथा आधारस्तंभ असलेल्या पत्रकारांंनी जनकल्याणासाठी प्रशासनाच्या अकार्यक्षमतेवर लेखनीचा उतारा वापरुन जाग आणावी. व्यवस्था बदलण्याऐवजी व्यवस्थेची गाडी रूळावर आणणे हा यावर उपाय आहे. पत्रकारांनी प्रशासनाला कोणते प्रश्न विचारावेत, यावर कोणाचाही अंकुश नसावा, असे प्रतिपादन निवृत्त सनदी अधिकारी महेश झगडे Mahesh Jhagde यांनी केले.

विश्वास ज्ञान प्रबोधिनी अ‍ॅण्ड रिसर्च इन्स्टिट्यूट व रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमाने विश्वास हब येथे आयोजित कार्यशाळेत केले. ‘प्रशासनाचे अंतरंग’ या विषयावर महेश झगडे यांनी माध्यमप्रतिनिधींना मार्गदर्शन केले. यावेळी व्यासपीठावर निवृत्त माहिती संचालक शिवाजी मानकर, विश्वास ज्ञान प्रबोधिनीचे मार्गदर्शक डॉ. कैलास कमोद, विश्वास ग्रुपचे कुटुंबप्रमुख विश्वास ठाकूर उपस्थित होते.

झगडे म्हणाले की, ‘लोकांना सर्व माहिती मिळायला हवी हा लोकशाहीचा उद्देश असला तरी प्रशासकीय यंत्रणा कार्यालयीन प्रक्रियेतील अंतरंग लोकांपुढे उलगडून सांगण्यास अनुत्सुक असते ही वस्तुस्थिती आहे. केवळ भारतातच नाही तर जगभरात लोकशाही कमकुवत होत चालली आहे. जगातील लोकशाहीचे आरोग्य बिघडत असल्याचे 167 देशांच्या सर्व्हेक्षणातून स्पष्ट झाले आहे.

माध्यमे किती प्रगल्भ आहेत यावर देखील लोकशाहीची पाया किती भक्कम राहील हे अवलंबून असल्याचे झगडे यावेळी म्हणाले. तक्रारींचे माहितीच्या अधिकाराच्या अर्जांचे प्रमाण वाढत असेल तर संबंधित प्रशासनाचे काम व्यवस्थित चाललेले नाही हे साधे सूत्र यावेळी झगडे यांनी सांगितले. प्रसार माध्यमे हा लोकशाहीतील अत्यंत महत्त्वाचा चवथा स्तंभ असून त्याची ताकद दाखवून द्यायला हवी, असे आवाहन झगडे यांनी यावेळी केले.

स्वागत व प्रास्ताविक विश्वास ठाकूर यानी केले. ते म्हणाले शासकीय परिपत्रक, विविध शासकीय योजना समजून घेण्यास सामान्य जनतेला नेहमीच अडचणी येत असतात. त्यावर ठोस निर्णायक माहिती देण्यास शासकीय यंत्रणा अनेकदा नकार देते. त्यावर सामान्य माणसालाच पत्रकाराला प्रशासनाला नेमके प्रश्न विचारता येत नाहीत. त्यावर मार्गदर्शन करण्यासाठी सदर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.

विश्वास ज्ञानप्रबोधिनी अ‍ॅण्ड रिसर्च इन्स्टिट्यूटचे मार्गदर्शन डॉ. कैलास कमोद म्हणाले की, जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी जनतेपर्यंत जाणारा सनदी अधिकारी हा जनसामान्यांचा आदर्श असतो. त्यामुळे समाजातील अनेक प्रलंबित प्रश्नांची वेगाने सोडवणूक होते. त्यासाठी माध्यम प्रतिनिधी महत्त्वाची भूमिका बजावत असतात व जनप्रबोधन करत असतात. त्यासाठीच आजच्या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.

झगडे यांचा परिचय डॉ. कैलास कमोद यांनी केला. तर सन्मान शिवाजी मानकर यांनी केला. शिवाजी मानकर यांचा सन्मान डॉ. कैलास कमोद यांनी केला.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com