लोकवर्गणीतून पालटले शाळेचे रूपडे

लोकवर्गणीतून पालटले शाळेचे रूपडे

निफाड । प्रतिनिधी | Niphad

तारूखेडले (Tarukhedle) येथील जि.प. सेमी इंग्रजी शाळेच्या दुरुस्तीसाठी (Repair of Semi English School) तसेच शालेय साहित्य (School supplies) खरेदीसाठी भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी दिनानिमित्त नागरिकांनी लोकवर्गणीतून शाळेचे रुपडे पालटण्यासाठी शाळेला 1 लाख 52 हजार रुपयांची देणगी दिली. सर्व देणगीदारांचा शाळेच्या वतीने यथोचित सत्कार करण्यात आला.

भारतीय स्वातंत्र्याची 75 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल शाळेच्या आवारात गणेश गोजरे यांनी आकर्षक रांगोळी काढुन उपस्थितांचे लक्ष वेधले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तारूखेडले येथील भुमिपूत्र डॉ.राजेंद्र जगताप हे होते. तर प्रमुख अतिथी म्हणून सरपंच ज्ञानेश्वर पवार, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष प्रविण जगताप, सोसायटी चेअरमन बबन किसन जगताप, ग्रा.पं. सदस्य शरद काशिनाथ जगताप, मदन जगताप, महेश जगताप, ज्ञानेश्वर शिंदे, ग्रामसेवक बेंडसे उपस्थित होते.

ग्रामसेवक बेंडसे यांच्या पुढाकाराने व शरद काशिनाथ जगताप यांच्या पाठपुराव्याने शाळेच्या रंगरंगोटी करिता 52 हजार रुपयांचा निधी (fund) उपलब्ध झाला. त्यातून शाळेचे माजी विद्यार्थी दत्तात्रय भालेराव व रामप्रसाद निवारे यांनी ना नफा ना तोटा या तत्वावर श्रमदान करून शाळेला रंगरंगोटी करण्याचे काम केले. तर सोसायटी चेअरमन बबन जगताप यांच्या योगदानाने 40 हजार 640 रु. निधी प्राप्त झाल्याने त्यातून शाळेला 4 संगणक व शाळेच्या ओट्याच्या दुरुस्तीचे काम मार्गी लागले.

तर शाळा व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष ज्ञानेश्वर शिंदे यांनी आपल्या मातोश्री बुद्धवासी सुमनबाई रामनाथ शिंदे यांच्या स्मरणार्थ शाळेच्या नामफलकासाठी 5 हजार 250 रु. निधी दिला. तर दानशूर ग्रामस्थांनी शाळेचा ओटा दुरुस्तीसाठी लोकवर्गणी जमा करून 18 हजार 110 रुपयांचा निधी जमा केला. मुलांनी शाळेचे बहुगुणी शिक्षक मदत बिरादार यांच्या मार्गदर्शनाने सार्वजनिक कार्यक्रम अंतर्गत केलेल्या नृत्याला बक्षिस म्हणून ग्रामस्थांनी 7 हजार रु. दिले. तर सामाजिक कार्यकर्ते प्रशांत गवळी यांनी सोशल मीडियाचा वापर करून 17 हजार रुपये लोकवर्गणी जमा केली.

त्यातून शालेय साहित्य विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्यात आले. तर ग्रामसेवक बेंडसे तसेच सरपंच आणि सदस्य यांनी शाळेला स्वच्छ पाणी मिळावे यासाठी कार्ड उपलब्ध करून दिले. अशा प्रकारे शाळेला एकूण 1 लाख 52 हजार रु. निधी लोकवर्गणीतून जमा झाला. या निधीसाठी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष प्रविण जगताप, उपाध्यक्ष ज्ञानेश्वर शिंदे, नितीन जगताप, महेश जगताप, अमोल विधाते, रंगनाथ शिंदे यांनी परिश्रम घेतले. त्यांना शाळेचे शिक्षक मदत बिरादार, मच्छिंद्र जगताप, अनिल पवार, श्रीमती. रेणूका गोराडे यांचे सहकार्य लाभले.

शाळेला मोठया प्रमाणात लोकवर्गणीतुन निधी जमा झाल्याबद्दल शाळेचे मुख्याध्यापक संदीप गायकवाड यांनी शाळेच्या वतीने ग्रामसेवक बेडसे, सरपंच, सर्व ग्रामपंचायत सदस्य, सोसायटी पदाधिकारी व कर्मचारी तसेच भारत जगताप, शंकर जगताप, चेअरमन बबन जगताप, सर्व सभासद तसेच मदत करणारे सर्व दानशूर देणगीदार ग्रामस्थ व प्रसार माध्यमातून लोकवर्गणी जमा करून शालेय साहित्य वाटणारे सामजिक कार्यकर्ते प्रशांत गवळी यांचे आभार मानले. या कार्यक्रमानंतर मान्यवरांच्या उपस्थितीत शाळेच्या प्रांगणात वृक्षारोपण करण्यात आले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com