तारुखेडले येथे भरदिवसा बिबट्या जेरबंद

तारुखेडले येथे भरदिवसा बिबट्या जेरबंद

करंजी खुर्द | वार्ताहर | Karanji Khurd

तारुखेडले (Tarukhedle) येथे शुक्रवारी सकाळी ०५.०० च्या सुमारास गट क्र २४९ राजेश संपत सांगळे यांच्या शेतात नामदेव जगताप वस्ती येथे बिबट्या जेरबंद करण्यात आला...

हा बिबट्या दोन ते तीन वर्ष वयाचा असून मादी आहे. याआधी परिसरात पाच ते सहा बिबटे पकडण्यात आले आहेत. काही वर्ष पूर्वी एक लहान मुलीचा मृत्यू बिबट्या हल्यात झाला होता.

या परिसरात मोठ्या प्रमाणात बिबट्यांचा मुक्तसंचार पाहण्यास मिळतो. येथील जगताप वस्ती व शेजारी असलेली गवळी वस्ती परिसरातील नागरिक भयभीत असून या बिबट्यांचा कायमचा बंदोबस्त करण्यात यावा ही मागणी ग्रामस्थ करत आहे.

वनविभागाने (Forest) तीन दिवसांपूर्वी मागणीनुसार पिंजरा लावण्यात आला होता. त्या पिंजऱ्यात आज सकाळी भरदिवसा बिबट्या अडकला. दिवसा बिबट्या जेरबंद झाल्यामुळे तारुखेडले परिसरातील नागरिक मोठ्या प्रमाणावर भयभीत झाले आहेत.

तारुखेडले हे गाव बिबटे प्रवरण क्षेत्र म्हणून घोषित आहे. आतापर्यंत १० पेक्षा जास्त बिबटे तारुखेडले गावात जेरबंद करण्यात आले आहेत. काही दिवसांपूर्वी बिबट्याच्या हल्ल्यात दोन शेळ्या ठार झाल्या होत्या. त्यामुळे वन विभागाने पिंजरा लावला होता त्यात बिबट्या जेरबंद झाला.

तारुखेडले येथे भरदिवसा बिबट्या जेरबंद
...अन् सप्तशृंगी देवीचं दिसलं मूळ रूप, व्हिडीओ एकदा पाहाच

आता निफाड तालुक्यात स्वतंत्र वन कार्यालय होणे गरजेचे आहे, पिंजरे व वन कर्मचारी संख्या वाढवणे गरजेचे आहे. त्याचबरोबर गस्त वाढवणे ही आवश्यक आहे, अशी मागणी स्थानिकांकडून होत आहे.

तारुखेडले येथे भरदिवसा बिबट्या जेरबंद
पोलीस बनले 'विघ्नहर्ता'! महिला आणि मुलाचे वाचवले प्राण

बिबट्याचा गवळी वस्ती, जगताप वस्ती येथे दोन ते तीन महिन्यापासून मुक्तसंचार सुरु आहे. पिंजरा लावण्यात यावा व कायमस्वरूपी बंदोबस्त करण्यात यावा ही वनविभाग यांना विनंती.

नामदेव जगताप, शेतकरी, तारुखेडले

तारुखेडले गाव बिबटे प्रवरण क्षेत्र म्हणून घोषित आहे. परंतु वनविभागामार्फत सोईसुविधा पाहिजे तशा भेटत नाही. गस्त वाढवणे, कायमस्वरूपी पिंजरे देणे, औषधोपचार, तत्काळ पंचनामा, भरपाई मिळणे अशी सुविधा भेटल्या पाहिजे.

प्रशांत गवळी, समाजिक कार्यकर्ते, तारुखेडले

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com