मौजे लहवित येथे बिबट्या जेरबंद

मौजे लहवित येथे बिबट्या जेरबंद

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

गेल्या काही दिवसांपासून मौजे लहवित येथील परिसरात बिबट्याचा (Leopard) मुक्तसंचार सुरु होता. बिबट्याला पकडण्यासाठी वनविभागाने (Forest) या ठिकाणी पिंजरा लावला. अखेर बिबट्याला पकडण्यात आज वन विभागाला यश आले आहे...

मौजे लहवित येथील शेतकरी राजाराम पुंडलिक पाळदे (Rajaram Palde) यांचे मालकी गट नंबर 182/1 मध्ये पिंजरा लावण्यात आला.

या पिंजऱ्यात बिबट मादी वय अंदाजे 3 ते 4 वर्ष पहाटेच्या सुमारास रेस्क्यू झाले आहे. त्यास ताब्यात घेऊन सुरक्षितस्थळी हलवण्यात आले आहे. यामुळे नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com