नाशिक | Nashik (प्रतिनिधी)

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या प्रथम सत्राची ऑनलाईन परीक्षा घेण्यासाठी नव्याने एजन्सी नियुक्त करण्यासाठी प्रक्रिया सुरू केली जाणार आहे.

येत्या १० दिवसात ही प्रक्रिया पूर्ण होईल होण्याची शक्यता असून नव्या एजन्सीला तयारीला वेळ देणे, सराव परीक्षा घेणे ही सर्व प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी बराच अवधी लागणार असल्याने विद्यापीठाची परीक्षा किमान १५ दिवस लांबणीवर पडणार असल्याने आता मार्च ऐवजी एप्रिलमध्ये होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

प्रथम सत्राची परीक्षा १५ मार्च पासून टप्प्याटप्प्याने सुरू करण्याचा निर्णय परीक्षा मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. पण परीक्षा घेण्यासाठीच्या एजन्सीवरून पेच निर्माण झाला आहे.

पण गेल्या काही दिवसांपासून त्यावर निर्णय घेतला जात नसल्याने प्रक्रिया ठप्प झाल्याने विद्यार्थी गोंधळात पडले आहेत.

त्यापार्श्वभूमीवर व्यवस्थापन समितीच्या सदस्यांनी कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांची भेट घेऊन चर्चा करून यावर निर्णय घेण्याची मागणी केली आहे. परीक्षेबाबत काय निर्णय घ्यायचा हे स्पष्ट केले जाईल, असे आश्वासन करमळकर यांनी दिले आहे.

विद्यापीठाच्या कंपन्या करतात काय?

विद्यापीठाची परीक्षा प्रक्रिया ठप्प झाली आहे, पण ऑनालइन परीक्षेचे काम करण्यासाठी मोठा खर्च करून दाेन कंपन्या उभ्या केलेल्या आहेत.

पण या कंपन्या हे काम करण्यास सक्षम नसतील तर त्या स्थापन करून काय उपयोग, असा प्रश्न अधिसभा सदस्य शशिकांत तिकोटे, दादाभाऊ शिनलकर, संतोष नानासाहेब ढोरे यांनी उपस्थित केला आहे.

तसेच विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये यासाठी त्वरित निर्णय घ्यावा अशी मागणी कुलगुरूंकडे केली आहे.