उत्तर महाराष्ट्रातील पहिले कामगार सेना कार्यालय सातपूर एमआयडीसीत; अमित ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन

उत्तर महाराष्ट्रातील पहिले कामगार सेना कार्यालय सातपूर एमआयडीसीत; अमित ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन

सातपूर | प्रतिनिधी | Satpur

महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेचे उत्तर महाराष्ट्रातील पहिल्या कार्यालयाचे उदघाट्न मनसे युवा नेते अमित ठाकरे (Amit Thackerat) यांच्या प्रमुख उपस्थितीत बुधवारी करण्यात आले...

यावेळी मनसे कामगार सेनेचे अध्यक्ष मनोज चव्हाण, चिटणीस मनोज रामराजे, मनसेचे प्रदेश सरचिटणीस अशोक मुर्तडक, प्रदेश उपाध्यक्ष अ‍ॅड.रतनकुमार इचम, हाजी अजगर शेख, महिला आघाडीच्या सुजाता डेरे, जिल्हाप्रमुख अंकुश पवार, शहराध्यक्ष दिलीप दातीर आदी प्रमुख उपस्थित होते.

यावेळी बोलताना कामगार सेनेचे अध्यक्ष मनोज चव्हाण यांनी सांगितले की, राज्यातील सुमारे ५२ एमआयडीसी पैकी चालू स्थितीतील सुमारे २६ एमआयडीसीमध्ये किमान वेतन कायद्याचे पालन केले जात नाही. मालक वर्गाकडून हा कायदा सर्रासपणे पायदळी तुडवला जातो.

उत्तर महाराष्ट्रातील पहिले कामगार सेना कार्यालय सातपूर एमआयडीसीत; अमित ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन
कसारा घाटात 'द बर्निंग ट्रक'चा थरार

या विरोधात आता मनसे रस्त्यावर उतरली आहे. त्याअनुषंगाने हे कार्यालय सुरु केले असून येत्या १२ तारखेला शर्मिला ठाकरे यांच्या हस्ते रायगड जिल्ह्यातील खालापूर एमआयडीसीत दुसरे कार्यालयाचे उद्घाटन करण्यात येणार आहे.

दरम्यान, आयोजक तथा मनसे कामगार सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष सलीम शेख, प्रदेश चिटणीस योगेश शेवरे व सोपान शहाणे यांच्या हस्ते उपस्थित पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी कामगारांच्या न्याय हक्कासाठी मनसे कामगारांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार असल्याचे सलीम शेख यांनी सांगितले.

उत्तर महाराष्ट्रातील पहिले कामगार सेना कार्यालय सातपूर एमआयडीसीत; अमित ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन
...अखेर अंगणवाडी सेविकांच्या मानधनात वाढ; लढ्याला मोठे यश

प्रास्ताविक प्रदेश चिटणीस योगेश शेवरे यांनी तर आभार सोपान शहाणे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी बंटी लबडे, नितीन माळी, वैभव महिरे, ज्ञानेश्वर बागडे, निशांत शेट्टी, विशाल भावले, विनोद यादव, चेतन खैरनार, मोहसीन शेख, जुनेद शेख, एजाज शेख, मीनानाथ नागरे, अमोल गवळी, राहुल सहाने, विनोद सिंग आदींसह मनसे कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा...

उत्तर महाराष्ट्रातील पहिले कामगार सेना कार्यालय सातपूर एमआयडीसीत; अमित ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन
जगभरात Twitter पुन्हा डाऊन; वापरकर्ते संतापले

कामगार सेनेची जबाबदारी शेख यांच्यासह शेवरे व शहाणेवर

महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेच्या प्रदेश उपाध्यक्षपदी माजी नगरसेवक सलीम शेख यांची तर प्रदेश चिटणीसपदी माजी नगरसेवक योगेश शेवरे व सोपान शहाणे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. उत्तर महाराष्ट्रातील कामगारांना न्याय देत पक्षाने टाकलेली जबाबदारी सार्थ ठरवणार असल्याची ग्वाही यावेळी शेख शेवरे व शहाणे यांनी अमित ठाकरे यांच्यासमोर दिली.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com