अकरावीची पहिली गुणवत्ता यादी ३० ऑगस्टला
नाशिक

अकरावीची पहिली गुणवत्ता यादी ३० ऑगस्टला

Abhay Puntambekar

नाशिक । प्रतिनिधी Nashik

नाशिक महानगर पालिका क्षेत्रातील कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये अकरावी प्रवेशासाठीची ऑनलाइन केंद्रीभूत पद्धतीने प्रक्रिया राबविली जात आहे. याअंतर्गत विद्यार्थ्यांना महाविद्यालय, शाखा निवडीसाठी आवश्यक असलेली भाग दोन भरण्याची प्रक्रिया बुधवार (दि. १२) पासून सुरू झाली असून पहिल्या गुणवत्ता यादीसाठी विद्यार्थ्यांना आपले पर्याय निवडीसाठी २२ ऑगस्टपर्यंत मुदत देण्यात आली आहे. येत्या 30 ऑगस्टला अकरावीची पहिली गुणवत्ता यादी (मिरीट लिस्ट) जाहीर केली जाणार आहे.

अकरावी प्रवेशप्रक्रियेतील महत्त्वाचा टप्पा म्हणजेच महाविद्यालयांचा पसंतीक्रम व शाखा निवडीकरिता अर्जाचा भाग दोन आहे. या प्रक्रियेकडे सर्वांचे लक्ष लागून होते. शिक्षण विभागाने या प्रवेशासाठीचे वेळापत्रक जारी केले आहे. त्यानुसार यापूर्वी नोंदणी करत अर्जाचा भाग एक भरण्याची प्रक्रिया पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांनाच अर्जाचा भाग दोन भरता येणार आहे. बुधवारपासून २२ ऑगस्टपर्यंत याकरिता मुदत दिलेली आहे. इन हाउस किंवा अन्य कोट्यामधून प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना या प्रक्रियेत सहभागी होण्याची आवश्यकता नसेल.

जागांपक्षा अर्ज आधिक

शहरातील ६० कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये विविध शाखांकरिता २५ हजार २७० जागा उपलब्ध आहेत. अकरावी प्रवेशासाठी आतापर्यंत नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांची संख्या २९ हजार २९० इतकी आहे. यांपैकी सर्वाधिक अर्ज विज्ञान शाखेसाठी प्राप्त झाले आहेत. बुधवारी दुपारपर्यंत २२ हजार ५४६ विद्यार्थ्यांनी अर्ज लॉक केले असून २१ हजार ९६० अर्जांची पडताळणी पूर्ण झाली आहे, तर ३ हजार १८२ विद्यार्थ्यांनी ‘ऑप्शन फिल’ केले आहे.

प्रवेशाचे संभाव्य वेळापत्रक

प्रवेश अर्जाचा भाग दोन भरणे - १२ ते २२ ऑगस्ट

तात्पुरती सर्वसाधारण गुणवत्ता यादी- २३ ऑगस्ट

यादीसंदर्भात हरकती नोंदविण्याची मुदत- २५ ऑगस्ट

(सायं. पाच वाजेपर्यंत)

नियमित प्रवेशफेरी एकसाठी गुणवत्ता यादी- ३० ऑगस्ट

यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेश निश्चितीची मुदत - ३१ ऑगस्ट ते ३ सप्टेंबर

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com