त्र्यंबकेश्वर
त्र्यंबकेश्वर
नाशिक

त्र्यंबकेश्वर : ३३ दिवसानंतर पहिले प्रतिबंधित क्षेत्र खुले

पालखी मार्ग मोकळा होण्यास मदत

Gokul Pawar

Gokul Pawar

त्र्यंबकेश्वर | Trimbakeshwer

शहरातील बोहर पट्टी भागातील पहिले प्रतिबंधित क्षेत्र ३३ व्या दिवशी खुले करण्यात आले आहे. नगरपालिकेच्या माध्यमातून खुले केले असून यामुळे पालखी मार्ग मोकळा होण्यास मदत झाली आहे.

शहरात २५ जून रोजी करोनाचा पहिला रुग्ण आढळल्यानंतर येथिल परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले होते. त्यानुसार येथील रुग्ण बरा झाला असल्याने प्रतिबंधित क्षेत्र हटवले आहे.

तब्बल महिनाभरानंतर हा परिसर खुला झाल्याने दार सोमवारी होणारी पालखी आता या मार्गावरून जाण्यास मदत होणार आहे.

यावेळी मुख्यधिकारी संजय जाधव यांचे सुचनेनुसार पालिकेचे अधिकारी उपस्थित होते.

Deshdoot
www.deshdoot.com