चाळीत कांदा सडल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान

चाळीत कांदा सडल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान

शिरवाडे वणी। वार्ताहर | Shirwade Vani

यावर्षी उन्हाळ कांदा (summer onion) काढणीपूर्वी कांद्याला अल्प बाजारभाव मिळत असल्याने अनेक शेतकर्‍यांनी (farmers) एप्रिल व मे महिन्यातच कांदा (onion) चाळीत साठविला होता. पुढे कांद्याला भाव मिळेल ही अपेक्षा शेतकर्‍यांची होती.

परंतु आता साठवलेला कांदा चाळीतच सडू लागल्याने ‘कांद्याचा झाला वांदा’ अशी काहिशी परिस्थिती शेतकर्‍याच्या वाट्याला आली आहे. त्यामुळे शासनाने आता कांद्याला दोनशे रुपये प्रति क्विंटल अनुदान (grant) जाहीर करावे अशी मागणी जोर धरू लागली आहे. मागील वर्षीच्या रब्बी हंगामात (rabbi season) कांद्याचे पीक जोमदार आले होते.

परिणामी कांद्याला (onion) उन्हाळ्यात (summer) फारसा भाव मिळत नव्हता. तसेच काही शेतकरी खरीप हंगामाच्या (kharif season) शेवटच्या टप्प्यातील पिकांना भांडवल उपलब्ध व्हावे व आर्थिक अडचणींचा सामना करता यावा यासाठी चाळीमध्ये कांदा साठवणूक (Onion storage) करीत असतात. परंतु सद्यस्थितीत देखील कांद्याला आवश्यक तेवढा भाव मिळत नसून यावर्षी कांदा चाळीमध्ये फार काळ टिकू शकला नाही. परिणामी तो आता लवकरच सडू लागल्याने शेतकर्‍यांची चिंता वाढली आहे.

शासनाने कांद्याला जीवन आवश्यक यादीत टाकल्याने शेतकर्‍याला बाजारभाव मिळणे दुरापास्त झाले आहे. साहजिकच शेतकर्‍याचे अर्थकारण बिघडलेले आहे. चाळीमध्ये साठविलेल्या कांद्याच्या वजनात 25 टक्के घट झाली असतांनाच आता हा कांदा जास्त काळ चाळीत राहिल्याने तो खराब होण्याचे प्रमाण देखील वाढले आहे. तसेच कांद्याची प्रतवारी देखील घसरली आहे.

सद्यस्थितीत नाफेड ने कांदा खरेदी बंद केली असून 1000 ते 1200 रुपये दरम्यान कांदा विकत असल्यामुळे साठवणुकीसाठी झालेला खर्चही फिटत नसल्याने कांदा उत्पादक (Onion grower) शेतकर्‍याचे कंबरडे मोडले आहे. गत दोन वर्षापूर्वीचे बाजारभाव बघता यावर्षी शेतकर्‍यांनी कांद्याची मोठ्या प्रमाणात लागवड केली होती. मात्र हा कांदा काढणीला येताच बाजारभावात मोठी घसरण झाली.

त्यामुळे पुढे भाव मिळेल या आशेवर शेतकर्‍यांनी कांदा चाळीत साठविला. मात्र आजचा बाजारभाव बघता ‘तेलही गेले अन् तुपही गेले’ अशी अवस्था शेतकर्‍याची झाली आहे. चाळीतील कांदा मोठ्या प्रमाणात सडल्याने आता आहे तो कांदा पडेल किमतीत विकण्याची नामुष्की शेतकर्‍यांवर आली आहे. अशा परिस्थितीत शासनाने कांद्याला प्रति क्विंटल 200 रु. अनुदान द्यावे. तसेच कांदा बाजारभाव वाढण्यासाठी कांदा निर्यातीला चालना द्यावी अशी मागणी कांदा उत्पादक करीत आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com