कादवा - भनवड रस्त्याचे भाग्य उजळणार

कादवा - भनवड रस्त्याचे भाग्य उजळणार

दिंडोरी । प्रतिनिधी | Dindori

अत्यंत वर्दळ असलेल्या वारंवार नादुरुस्त होणार्‍या लखमापूर फाटा ते खेडगाव रस्त्याचा वनवास लवकरच संपणार असून सदर रस्त्याला दर्जा उन्नती मिळत सदर रस्ता राज्य मार्ग (state route) झाल्याने या रस्त्याचे भाग्य उजळणार आहे. दरम्यान थेट गुजरात (gujrat) राज्याला सदर रस्ता जोडत पुढे शिर्डीला (shirdi) जाण्यासाठी जवळचा राज्य मार्ग होणार असून औद्योगिक वसाहतीतील (Industrial colony) वाहनांना तसेच शेतकर्‍यांना (farmers) या मार्गाचा फायदा होणार आहे.

दिंडोरी तालुक्यातील (dindori taluka) लखमापूर फाटा ते कादवा कारखाना (kadva factory) खेडगाव हा रस्ता जिल्हा मार्ग असून सदर रस्त्यावर त्याप्रमाणे निधी (fund) तरतूद होत होती मात्र लखमापूर औद्योगिक वसाहत ची अवजड वाहतूक तसेच पेठ (peth), दिंडोरी (dindori), सुरगाणा (surgana) येथील पिंपळगाव बसवंत (pimpalgaon basvant) कडे जाणारी वाहतूक , कादवा कारखान्याची ऊस वाहतूक या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात असल्याने सदर रस्ता वारंवार नादुरुस्त होत होता.याबाबत कादवा चे अध्यक्ष श्रीराम शेटे (shriram shete) यांनी बांधकाम विभागाशी पत्रव्यवहार करत सदर रस्त्यावरील वर्दळ वाहतूक बघता सदर रस्ता दर्जा उन्नती देत राज्य मार्ग करून संपूर्ण रस्ता नूतनीकरणाची मागणी (Demand for road renewal) केली होती.

विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ (Assembly Vice President Narhari Jirwal) यांनीही याबाबत शासन दरबारी पाठपुरावा करत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या (Public Works Department) अधिकार्‍यांना सदर रस्त्याची पाहणी करण्यास सांगत तातडीने प्रस्ताव करण्याच्या सूचना दिल्या होत्या.बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता यांनी चार महिन्यापूर्वी सदर रस्त्याची पाहणी करत कादवा कारखाना (kadva factory) येथे आढावा बैठक घेत नियोजन केले होते. सदर रस्ता गुजरात हद्द पासून पुढे अंबोडे-बेडसे- ठानगाव-बार्‍हे- हस्ते - भनवड -वांजोळे - टीटवे - कोशिंबे - लखमापूर -वरखेडा कादवा कारखाना - खेडगाव - शिंदवड -वडनेर - शिरवाडे- पालखेड - दावचवाडी कारसुळ व पुढे राज्य मार्ग 27 ला जोडला जाणार आहे.

सदर रस्ता राज्य मार्ग 414 म्हणून ओळखला जाणार असून त्याची लांबी सुमारे 103 किलोमिटर असणार आहे. सदर रस्त्याची दर्जा उन्नती होवून राज्य मार्ग झाल्यावर गुजरात (gujrat) ला जोडणारा तसेच सुरगाणा व पेठ तालुक्याला जवळचा मार्ग होणार आहे.लखमापूर औद्योगिक वसाहत मधील जड वाहने,कादवा कारखान्याची ऊस वाहतूक शेतकर्‍यांची शेतमाल वाहतूक सुलभ होणार आहे. लवकरच नूतनीकरण प्रक्रिया सुरू होणार आहे.

भनवड लखमापूर कादवा खेडगाव हा रस्ता जिल्हा मार्ग होता त्यानुसार देखभाल दुरुस्ती ला कमी निधी मिळत होता मात्र या रस्त्यावर वाहनांची खूप वर्दळ तसेच लखमापूर औद्योगिक वसाहती मधील आवजड वाहतूक,कादवा कारखान्याची ऊस वाहतूक मुळे रस्ता वारंवार खराब होत होता सदर रस्त्यावरील वर्दळ बघता दर्जा उन्नती आवश्यक होती सदर रस्ता दर्जा उन्नती करत आता सदर रस्ता राज्य मार्ग होणार असून त्याचे नूतनीकरण होणार आहे सदर रस्ता थेट गुजरात राज्याला जोडला जाणार असून पेठ, सुरगाणा, दिंडोरी,चांदवड ,निफाड तालुक्यातील जनतेला त्याचा फायदा होणार आहे.

- नरहरी झिरवाळ, विधानसभा उपाध्यक्ष, महाराष्ट्र राज्य

भनवड-लखमापूर - वरखेडा- कादवा - खेडगाव या रस्त्यावर मोठी वर्दळ होती लखमापूर औद्योगिक वसाहत वाहतूक,ऊस वाहतूक यामुळे रस्ता वारंवार खराब होत होता सदर रस्ता राज्य मार्ग होत त्यांचे मजबुतीकरण व नूतनीकरण व्हावे यासाठी शासनाशी वारंवार पत्रव्यवहार केला अधिकार्‍यांच्या ही बाब निदर्शनास आणून दिली. विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी पाठपुरावा करत सदर रस्त्यास राज्य मार्गाचा दर्जा मिळवून दिला आहे या रस्त्यामुळे गुजरात राज्य जोडले जाणार असून दिंडोरी पेठ सुरगाणा चांदवड निफाड तालुक्यातील दळणवळण सुलभ होणार आहे. त्यामुळे शासनाचे आभार मानतो.

- श्रीराम शेटे, चेअरमन कादवा कारखाना

Related Stories

No stories found.