शेतमालाला भाव नाही; शेतकऱ्याने फिरविला पाच एकर कोबी पिकावर नांगर

शेतमालाला भाव नाही; शेतकऱ्याने फिरविला पाच एकर कोबी पिकावर नांगर

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

शेतमालाला योग्य भाव मिळत नसल्याने नाशिकच्या इगतपुरी तालुक्यातील (Igatpuri Taluka) पाडळी देशमुख येथील शेतकरी (farmer) अंबादास खैरे यांनी आपल्या शेतात पिकविलेल्या कोबी पिकाला (Cabbage crop) १ रुपया भाव मिळत असल्याने

तसेच ते पिक काढण्यासाठी काढणीचा खर्च देखील परवडत नसल्याने आपल्या ५ एकर क्षेत्रातील कोबी पिकावर (Cabbage crop) ट्रॅकरच्या (tractor) सहायाने नांगर फिरविला. इगतपुरी तालुक्यातील पाडळी देशमुख येथील शेतकरी अंबादास खैरे यांनी कोबी लागवडीसाठी प्रती एकर ५० हजार रुपये खर्च केला असून त्यांच्या पाच एकर कोबी लागवडीसाठी तब्बल अडीच लाख रुपये खर्च झाला आहे.

मात्र कोबी पिकाला केवळ १ रुपये भाव मिळत असल्याने त्यांनी आज (दि.१) शासनाचा निषेध नोंदवीत आपल्या ५ एकर कोबी पिकावर नांगर फिरविला. शासनाने शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेतले नाही तर शेतकरी (farmers) पुन्हा एकदा संपावर जातील असा इशाराही त्यांनी यावेळी दिला आहे.

राज्यातील कांदा (onion), द्राक्ष (grapes) यासह विविध शेतमाल पिकविणारा शेतकरी आपल्या शेतमालाला भाव मिळत नसल्याने अडचणीत सापडला आहे. त्यामुळे अनेक शेतकरी आत्महत्या करत आहे. ही अतिशय दु:खाची बाब आहे. मला राज्यातील शेतकऱ्यांना सांगायचे आहे. आपण कुठल्याही परिस्थित खचून न जाता आत्महत्या करू नये. शासनाला आपली दखल घ्यावीच लागणार आहे. जर शेतकऱ्यांना शासनाने योग्य ती मदत केली नाही तर सरकारला त्यांची जागा दाखवून देऊ

– शेतकरी अंबादास खैरे

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com