Nashik News : कर्जाला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या

 Nashik News : कर्जाला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या

वावी |वार्ताहर| Vavi

सिन्नर तालुक्यातील (Sinnar Taluka) पांगरी येथील गोरख कचरू शिरसाठ (वय-५५) या शेतकऱ्याने (Farmer) कर्जाला (Loan) कंटाळून आत्महत्या (Suicide)केल्याची घटना घडली आहे. गोरख यांची पत्नी पोल्ट्री फॉर्मवर चक्कर मारण्यासाठी गेली असता घडलेला प्रकार त्यांनी बघितला. यानंतर ताबडतोब आरडाओरड केल्यावर जवळपास असलेल्या शेजाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. मात्र, तो पर्यंत गोरख यांचा मृत्यू (Death) झाला होता.

यावेळी गोरख शिरसाठ यांच्या खिश्यात बँकेच्या (Bank) असणाऱ्या कर्जामुळे मी आत्महत्या करत आहे, अशी लिहिलेली चिठ्ठी सापडली. त्यामध्ये सिन्नर व्यापारी बँक एक लाख देणे असल्याचा उल्लेख आहे. तसेच बहुउद्देशीय बँक २ लाख घेतले होते त्याचे व्याज धरून अधिक रक्कमेची मागणी या बँकेकडून सातत्याने होत होती. त्यामुळे या बँकेच्या त्रासाला कंटाळून मी आत्महत्या करत असल्याचे गोरख यांनी चिठ्ठीत नमूद केले आहे.

दरम्यान, येथील शेतकरी संघटनेने सदर बँकांवर कारवाही करावी अशी मागणी केली आहे. तर मृत गोरख यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी, दोन मुले व दोन भाऊ असा परिवार आहे. तसेच सदर घटनेची माहिती मिळताच वावी पोलीस ठाण्याचे (Vavi Police Station) सह.पोलीस निरीक्षक चेतन लोखंडे यांच्यासह पो.ह.सतीश बैरागी यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत घटनेची पाहणी करत पंचनामा केला.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com