इतिहासाची साक्ष देणार्‍या दुर्लक्षित खैराई किल्ल्याची पडझड

पर्यटन विकासापासून वंचित
इतिहासाची साक्ष देणार्‍या दुर्लक्षित खैराई किल्ल्याची पडझड

नाशिक । गोकुळ पवार Nashik

नाशिक ( Nashik ) जिल्ह्यातील दुर्लक्षित असलेला हरसूलजवळील( Harsul ) खैराई किल्ल्याची ( Khairai Fort )दिवसेंदिवस दुरवस्था होत आहे. किल्ल्यावर मोठ्या प्रमाणावर पडझड झाली असून याकडे पर्यटन विभागाने (Department of Tourism ) लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.

दरम्यान, नाशिक जिल्ह्याला अनेक गडकोटांचा वारसा लाभलेला आहे. परंतु अनेक गडकोटांची अवस्था बिकट झाली आहे. असाच हरसूलजवळ प्राचीन शिवकालीन इतिहासाचा साक्षी असलेला खैराई किल्ला मोठ्या थाटात उभा आहे. परंतु लांंबून भारदस्त दिसणारा खैराई किल्ला मात्र आतून मोडकळीस आला आहे. खैराई किल्ल्याचे बुरूज ढासळले असून तोफा बेवारस अवस्थेत तर पाण्याचे कुंड भग्नावस्थेत पाहावयास मिळत आहे.

ठाणापाडा, साठेचा पाडा, उंबरपाडा, खैराई पाली, बेहडपाडा आदी भागातून या किल्ल्यावर जाता येते. माचीपाडा हा त्यातील एक पाडा असून अगदी खैराई किल्ल्याच्या पायथ्याशी आहे. मात्र किल्ल्याच्या प्रवेशद्वाराची अत्यंत दुरवस्था झाल्याचे पाहायला मिळते.

त्र्यंबकेश्वर तालुक्यात वाघेरा किल्ला सर्वज्ञात आहे. परंतु खैराई किल्ला अद्यापही पर्यटकांपर्यंत पोहोचलेला नाही. किल्ला दुर्लक्षित असल्यामुळे विकासापासून वंचित आहे. पुरातन विभागाने किल्ल्याची होत असलेली दुरवस्था थांबवण्याची मागणी पर्यटक तसेच स्थानिक ग्रामस्थांकडून केली जात आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com