नाशिकरांना आता महाबळेशवरचा अनुभव घरबसल्या

file photo
file photo

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

नाशिकसह (nashik) राज्यभर थंडीचा (cold) जोर वाढला आहे. अनेक ठिकाणी तापमान (temperature) घसरले आहे. महाबळेश्वरात (Mahabaleshwar) तापमान 10.4 अंशांवर पोहोचले आहे तेवढेेच तापमान नाशिकचे (nashik) झाल्याने नाशिकरांना आता महाबळेशवरचा अनुभव घरबसल्या घेता येत आहे.

नाशिकचे तापमान आज पुन्हा एक अशाने घसरले, धुळ्यातही (fog) तापमानात घट होऊन ते 8.2 अंशांवर पोहोचले आहे. नाशिकमध्येही हुडहुडी भरली आहे. रब्बी पिकांना (rabbi crop) पोषक थंडी पडल्याने शेतकरी (farmers) वर्गात आनंदाचे वातावरण पसरले आहे. ग्रामीण भागात सर्वत्र शेकोट्या पेटवुन थंडी पासुन संंरक्षण केले जात आहेत.

नाशिकचे किमान तापमान आज 10.4 अंश सेल्सीअस होते. नाशिकमध्ये थंडीचे आगमन थोडे उशीराच झालें. पावसाळ्या (monsoon) प्रमाणेच थंंडीही यंदा जोरात राहणार आहे. गेल्या काही दिवसांपासून पारा सातत्याने खाली उतरत आहे. नाशिकचे तपामन तीन दिवसांत 13 अंश सेल्सिअसवरून 10.4 अंशापर्यंत खाली घसरले आहे. निफाडमध्ये (niphad) तर आज चक्क 8.1 सेल्सिअस तापमानाची नोंद झली आहे. व्यायाम शाळा, जिम (gym), जॉगिंग ट्रॅक (jogging track) हळूहळू गर्दीने फुलून जात असताना गोदा काठी मात्र सकाळी फारसे कोणी दिसतच नाही.

मंदिरांच्या अवती भवती पांंढर्‍या शुभ्र धुक्याची चादर, त्या अडून गोदावरीच्या (godavari) पाण्यात डोकावणारी सूर्य किरणांमुळे गोदेचे सौदर्य खुलुन दिसत आहे. पर्यटकही या थंडीचा आनंद घेत आहेत. अजुन रविवारचा दिवस कडक्याचा थंडीचा राहणार आहे. वाढत्या थंडीच्या पार्श्वभूमीवर सकाळी मॉर्निंग वॉकसाठी (Morning walk) घराबाहेर पडणार्‍या नागरिकांची गर्दी वाढली कमी होत असल्याने नेहमी गजबजलेले जॉगींग ट्रॅक (jogging track) आता निर्मनुष्य झाल्याचे दिसत आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com