मविप्र निवडणुकीचा उत्साह शिगेला

मविप्र निवडणुकीचा उत्साह शिगेला

नाशिक | प्रतिनिधी | NASHIK

एकशे आठ वर्षे बहुजन समाजाच्या हितासाठी 'बहुजन हिताय, बहुजन सुखाय' हे ब्रीद घेऊन कार्यरत असलेल्या मराठा विद्या प्रसारक समाजाच्या ( Maratha Vidya Prasarak Samaj Sanstha Elections) कार्यकारी मंडळाच्या निवडीसाठी पंचवार्षिक निवडणुकीकरिता काल मतदान झाले....

आज सकाळी आठ वाजेपासून मतमोजणी प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. मविप्रत 'प्रगती'च राहणार की 'परिवर्तन' होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मविप्र निवडणुकीचा उत्साह शिगेला पोहोचला असून जिल्ह्याभरातून कार्यकर्ते केटीएचएम कॉलेजजवळ दाखल होत आहे. मतमोजणी स्थळी मोठी गर्दी झाली आहे.

मतमोजणीच्या स्थळी कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. सहाय्यक पोलीस आयुक्त दिपाली खन्ना, आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक साजन सोनावणे हे आपल्या फौजफाट्यासह ठाण मांडून बसले आहेत. यंदा कार्यकर्त्यांसाठी एलईडी स्क्रीन बसवण्यात आले आहे.

यावेळी प्रथमच मतमोजणीला रुग्णवाहिका आणि अग्निशमन दलाचे वाहन मतमोजणीच्या ठिकाणी तैनात करण्यात आले आहे

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com