नाताळ सणाचा उत्साह शिगेला

शहरातील विविध चर्चमध्ये धार्मिक कार्यक्रम
नाताळ सणाचा उत्साह शिगेला

नाशिकरोड । प्रतिनिधी Nashikroad

ख्रिस्ती बांधवांनी नाताळ सण Christmas साजरा करण्यासाठी नाशिकरोडसह परिसरात जय्यत तयारी केली आहे. सेंट झेवियर्स शाळेतील बाळ येशू मंदिर , जेलरोड येथील संत अन्ना महामंदिर, मुक्तिधामसमोरील सेंट फिलीप चर्चमध्ये तयारी पूर्ण झाली आहे. चर्चबरोबरच घर, शाळांमध्ये सजावट, आकाश कंदील, रोषणाई, प्रभू येशूच्या जन्मावर आधारीत देखावे लक्ष वेधून घेत आहेत.

करोनाच्या corona पार्श्वभूमीवर चर्चमधील गर्दीचे व्यवस्थापन करण्यासाठी विशेष नियोजन करण्यात आले आहे. नाताळच्या आदल्या दिवशी रात्री 12 वाजता होणारी विशेष प्रार्थना, ख्रिस्त गीत समूह गायन यंदा रात्री नऊ वाजता झाले. ख्रिस्ती बांधवांनी मध्यरात्री नाताळच्या शुभेच्छा दिल्या. आज (दि.25) सकाळी 8 वाजता सर्व चर्चमध्ये विशेष प्रार्थना (पवित्र मिसा) होणार असून विश्वशांतीसाठी प्रार्थना केली जाणार असल्याची माहिती नाशिक कॅथलिक धर्मप्रांताचे मुख्य धर्मगुरू बिशप लुडस डॅनियल यांनी दिली. नाताळनिमित्त त्यांनी सर्वांना शांती, प्रेम व आपुलकीचा शुभसंदेश दिला आहे.

कॅथलिक धर्मप्रांताचे सर्व फादर्स, सिस्टर्स, भक्तगण व मुख्य धर्मगुरू विश्वशांतीसाठी प्रार्थना करणार आहेत. नाशिक कॅथलिक धर्म प्रांतात पाच जिल्हे येतात. या धर्म प्रांतातंर्गत 38 धर्मगुरु, 34 चर्चचा समावेश होतो. करोनाचे नियम पाळून फादर पीटर डिसूझा, नोलास्को गोम्स, संतान रॉड्रिग्ज, पाईस रॉड्रिग्ज, व्हेनसी डीमेलो, एरेल्ड फर्नांडिस यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम होणार आहेत.

बिशप लुर्डस डॅनियल यांचा संदेश Message from Bishop Lourdes Daniel

बिशप लुर्डस डॅनियल यांनी भाविकांना दिलेल्या शुभेच्छा संदेशात म्हटले आहे की, करोनाच्या नियमांची अंमलबजावणी करावी. मात्र, आनंदावर विरजण पडू न देता योग्य ती खबरदारी घेत नाताळ साजरा करावा. प्रभू येशूचा जन्म हा प्रभू सदैव आपल्या सोबत असल्याचे स्मरण करून देतो. मनुष्य हा परमेश्वराची सर्वोत्कृष्ट निर्मिती आहे. प्रत्येक मनुष्य त्याच्या नजरेत अमूल्य आहे. तो सर्वांवर बिनशर्त प्रेम करतो.

गेल्या दोन वर्षात करोनामुळे असंख्य व्यक्तींनी प्राण गमावले आहेत. दुःख, दारिद्र्य, भूक, बेरोजगारी या काळात मोठ्या प्रमाणात असतानाच भ्रष्टाचार, पिळवणूक, क्रूरता, हिंसा यांचाही अनुभव आपण घेतला. मनुष्य असहाय्य झाला आहे. अशा पार्श्वभूमीवर प्रभू येशूचा जन्म अधिक अर्थपूर्ण ठरतो. आपला उध्दार करून क्षमा करण्यासाठी, शांती व अमर्त्य प्रेमाचे राज्य करण्यासाठी तो आला आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com