सहकार व पालकमंत्र्यांच्या 'या' आश्वासनानंतर बिर्‍हाड आंदोलनाची सांगता

सहकार व पालकमंत्र्यांच्या 'या' आश्वासनानंतर बिर्‍हाड आंदोलनाची सांगता

मालेगाव । प्रतिनिधी | Malegaon

जिल्हा बँकेतर्फे शेतकर्‍यांकडे होत असलेली सक्तीची कर्जवसुली (Debt Recovery) थांबविण्यासह इतर बँकांप्रमाणे मुद्दलावर सहा ते आठ टक्के व्याज आकारणीस संमती देतांनाच ज्या शेतकर्‍यांच्या (farmers) शेतजमीनी जप्त करण्याची कारवाई करण्यात आली आहे.

त्यांना 157 प्रमाणे अर्ज केल्यास स्थगिती देण्याचे आश्वासन सहकारमंत्री अतुल सावे (Cooperation Minister Atul Save) यांनी दिले आहे. या आश्वासनाची पुर्तता करण्याची जबाबदारी पालकमंत्री दादा भुसे (Guardian Minister Dada Bhuse) यांनी सर्वांसमोर स्विकारली आहे. त्यामुळे आजचे बिर्‍हाड आंदोलन (agitation) आपण थांबवत आहोत.

सहकार व पालकमंत्र्यांनी (Guardian Minister) दिलेला शब्द व आश्वासनाची पुर्तता न केल्यास येत्या 16 फेब्रुवारीरोजी मुख्यमंत्र्यांच्या ठाणे येथील निवासस्थानासमोर हजारो शेतकरी बिर्‍हाड आंदोलन छेडतील, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे (swabhimani shetkari sanghatna) नेते राजू शेट्टी (Raju Shetty) यांनी येथे बोलतांना दिला.

येथील कॉलेज मैदानावर दुपारी 12 वाजेपासून सुरू असलेल्या शेतकर्‍यांच्या बिर्‍हाड आंदोलनाची रात्री साडेआठ वाजता सहकारमंत्री अतुल सावे व पालकमंत्री दादा भुसे यांनी भ्रमणध्वनीवरून आंदोलकनेते राजू शेट्टी यांच्याशी चर्चा केल्यानंतर सांगता केली गेली. पालकमंत्री दादा भुसे यांनी भ्रमणध्वनीवरून आंदोलक शेतकर्‍यांशी संवाद साधला. सहकारमंत्री अतुल सावे यांनी 6 ते 8 टक्के सरळ व्याजाने कर्ज आकारणी तसेच सक्तीची वसुली थांबविण्यास मान्यता दिली असल्याचे सांगितले. या सर्व बाबी कायद्याच्या चौकटीत बसून सोडविण्याच्या दृष्टीकोनातून आपण स्वत: पुढाकार घेणार असल्याचे आश्वासन देखील भुसे यांनी यावेळी बोलतांना देत आंदोलन मागे घेण्याची विनंती केली.

यानंतर शेतकर्‍यांशी संवाद साधतांना राजू शेट्टी यांनी सहकार मंत्र्यांबरोबर दिवसभरात झालेल्या चर्चेची माहिती आंदोलक शेतकर्‍यांना दिली. इतर बँकांप्रमाणेच मुद्दलावर सहा ते आठ टक्के व्याज आकारणी करत वसुलीस सहकारमंत्री सावे यांनी मान्यता दिली आहे. तसेच ज्या शेतकर्‍यांवर बँकेने कारवाई केली आहे त्या कारवाईस 157 प्रमाणे सहकारमंत्र्यांकडे अर्ज देवून स्थगिती घेत शेतकर्‍यांना आपल्या शेतजमीनी सोडवून घेता येणार आहे.

तुम्ही अर्ज करा मी स्थगिती देतो अशी ग्वाही सहकारमंत्री सावे यांनी दिली असल्याचे स्पष्ट करत शेट्टी यांनी या सर्व निर्णयांची शासनाकडून अंमलबजावणी करून घेण्यासाठी पालकमंत्री भुसे यांनी जबाबदारी घेण्याचा शब्द दिला आहे. सहकार व पालकमंत्री यांनी आपल्या मागण्या मान्य केल्या आहेत. त्यामुळे आजचे बिर्‍हाड आंदोलन आपण थांबवत आहोत.

येत्या 16 फेब्रुवारीपर्यंत या मंत्र्यांनी दिलेला शब्द व आश्वासन न पाळल्यास ठाणे येथे मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर हजारो शेतकरी बिर्‍हाड आंदोलन छेडतील, असा इशारा शेट्टी यांनी शेवटी बोलतांना देताच आंदोलक शेतकर्‍यांनी या निर्णयाचे टाळ्यांचा कडकडाट करत समर्थन केले. यावेळी मार्गदर्शन करतांना शेतकरी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष ललित बहाळे यांनी सहकारमंत्र्यांनी कर्जदार शेतकर्‍यांच्या मागण्या मान्य केल्या आहेत.

157 प्रमाणे जप्त शेतजमीनींच्या कारवाईस स्थगिती देखील दिली जाणार आहे. ही प्रक्रिया सहकारमंत्र्यांकडे पुर्ण करण्याचे काम जिल्हा बँक शेतकरी संघर्ष समिती पाठपुरावा करत करेल, असे स्पष्ट केले. सहकारमंत्र्यांनी आश्वासनाची पुर्तता न केल्यास ठाणे येथे मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर एक महिन्यानंतर आंदोलन छेडू, असा इशारा त्यांनी शेवटी बोलतांना दिला.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com