'त्या' चौकातील अतिक्रमण हटले; आता उड्डाणपुलाची प्रक्रिया व्हावी

'त्या' चौकातील अतिक्रमण हटले; आता उड्डाणपुलाची प्रक्रिया व्हावी

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

मागील महिन्यात शहरातील औरंगाबाद नाका (Aurangabad Naka) येथील मिर्च चौकात एका अपघातामुळे (accident) बसला (bus) आग (fire) लागून निष्पाप लोकांचा बळी गेला होता. याची दखल घेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) यांनी त्या ठिकाणी पाहणी करून विविध सूचना केल्या होत्या.

त्यानुसार हा चौक आणखी मोकळा करण्याची प्रक्रिया सुरू झाली होती. महापालिकेच्या नगर नियोजन विभागाने (Town Planning Department) या ठिकाणी अतिक्रमणधारकांना अतिक्रमण (Encroachment) काढण्याचे नोटिसा बजावून परिसर अतिक्रमण मुक्त केला आहे, मात्र आता त्या ठिकाणी उड्डाणपूल (flyover) तयार करण्याची प्रक्रिया सुरू व्हावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

सुमारे 13 व्यावसायिकांनी अतिक्रमीत बांधकाम (Encroachment construction) स्वतःहून काढले होते तर अनेक टप-या अतिक्रमण विभागाने (Encroachment Department) हटविले आहे. मिर्ची चौकासह संपूर्ण मार्गावर नगरनियोजन विभागाने अनधिकृत बांधकामाचे डिमार्केशन करुन नोटीस बजावले होते. यानंतर काही दिवसांनी संपूर्ण परिसर अतिक्रमण मुक्त करण्यात आले म्हणून येथील रस्त्याच्या रुंदीकरण (Road widening) कामाला गती मिळाली.

दुर्घटना घडल्यानंतर त्वरित मनपाने मिर्ची चौकासह शहरात अतिक्रमण हटाव मोहीम सुरू केली होती.बस अपघाताच्या पार्श्वभूमिवर बांधकाम विभागाने गतिरोधक आणि खडखडाट पट्टीची (रंबल स्ट्रीप) उभारणी केली. तसेच अपघात प्रवण क्षेत्र आणि गतीरोधकाचा फलक लावला आहे. रस्त्याचं फॅनिंग करण्यात आले आहे. संपूर्ण रस्त्याची दुरुस्ती करण्यात आली आहे.

मिर्ची चौकाच्या धर्तीवर नांदूर नाका आणि सिद्धिविनायक लॉन्स चौकातही सुधारणा केली जात आहे. दरम्यान मुख्यमंत्र्यांनी आयोजित केलेल्या व्हिडिओ मीटिंगच्या माध्यमातून चर्चेत नाशिक महापालिकेचे आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी त्या चौकात उड्डाणपूल तयार करण्याची सूचना केली होती. त्यानुसार पीडब्ल्यूडी विभागाच्या वतीने त्या ठिकाणी उड्डाणपूलाचे कामाचे नियोजन सुरू झाल्याचे समजते आहे तरी घटनेला एक महिना उलटला आहे. आता दुसरी घटनेची वाट न पाहता प्रशासनाने या ठिकाणी उड्डाणपूल तयार करावे, असे सांगितले जात आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com