निवडणुका या पुढे बिनविरोधच

अ. भा. नाट्य परिषद नाशिक शाखेची वार्षिक सभेत ठराव
निवडणुका या पुढे बिनविरोधच

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

मंत्री उदय सामंत (Minister Uday Samant) यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत पुढील काळात नाट्य परिषदेच्या मध्यवर्ती शाखेच्या निवडणुका (election) बिनविरोध (Unopposed) करण्यासाठी

नाशकातून तीन नावे पाठविण्याचा ठराव आज अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या (All India Marathi Theater Council) नाशिक शाखेची वार्षिक सर्वसाधारण सभेत (Annual General Meeting) करण्यातआला. 

आज सायंकाळी शाखेचे अध्यक्ष प्रा. रविंद्र कदम यांच्या अध्यक्षतेखाली वार्षीक सभा झाली. यावेळी कोणतेही वादविवाद न होता सभा खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. यावेळी परिषदेचे प्रमुख कार्यवाह सुनील ढगे, उपाध्यक्ष शाहु खैरे, अनिरुद्ध धर्माधिकारी, खजिनदार ईश्वर जगताप, सहकार्यवाह राजेश भुसारे, विजय शिंगणे, कार्यकारिणी सदस्य पियुष नाशिककर यांच्यासह परिषदेचे अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

खजिनदार ईश्वर जगताप यांनी पुढील वर्षासाठी मांडलेल्या अंदाजपत्रकासह संस्थेतर्फे करण्यात आलेल्या जमाखर्च, ताळेबंदास  एकमताने मंजुरी देण्यात आली. बैठकीत संस्थेतर्फे पुढील वर्षी राबविण्यात येणा-या विविध उपक्रमांच्या वेळापत्रकासही मंजुरी देण्यात आली. यावेळी सनदी लेखापाल सुयोग कदम यांच्या हिशेब तपासणी अहवालावर चर्चा होऊन त्यांनाच पुढील काळासाठी लेखापरिक्षणाचे काम देण्याचा ठरावही बहुमंताने मंजूर करण्यात आला.

व्यावसायिक नाटकांच्या तिकिटात नाट्यपरिषदेच्या कार्यकारिणीसह सदस्यांना सवलत मिळण्याबाबत बैठकीत चर्चा झाली, परंतु सद्या मोजकी काही व्यावसायिक नाटके वगळता प्रेक्षकांचा प्रतिसाद नसल्याने याविषयावरील चर्चेला पूर्णविराम देण्यात आला. महाराष्ट बँकेऐवजी ‘विश्वास’ला पसंतीसंस्थेतर्फे बँक ऑफ महाराष्टमध्ये वीस लाख रुपयांची ठेव ठेवण्यात आली होती.

परंतु महाराष्ट बँकेपेक्षा विश्वास बँक याठेवीवर अधिक व्यादर देत असल्याने ती विश्वास बँकेत ठेवण्याबाबतचा ठराव मांडण्यात आल्यावर त्याला बहुमताने मंजुरी देण्यात आली. याशिवाय विश्वास बँक संस्थेला आर्थिक मदतही देत असल्याचा विषयही अध्यक्ष, प्रमुख कार्यवाहसह खजिनदारांनी उपस्थित केल्यावर विश्वास बँकेत ठेव ठेवण्यासही एकमताने मंजुरी देण्यात आली. सहकार्यवाह राजेंद्र भुसारे यांनी आभार मानले.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com