ज्येष्ठ शिवसैनिकांना विश्वासात घेऊनच निवडणूक रणनिती आखणार

माजी आमदार वसंत गितेंचे प्रतिपादन
ज्येष्ठ शिवसैनिकांना विश्वासात घेऊनच निवडणूक रणनिती आखणार

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

ज्येष्ठ शिवसैनिक आणि माजी पदाधिकारी ही पक्षाची खरी संपत्ती आणि ताकद असून त्यांच्या त्यागामुळेच आज पक्षाचा मोठा विस्तार झाला आहे. 2022 च्या नाशिक महानगरपालिकेवर (Nashik NMC) एकहाती सत्ता आणून शिवसेनेचा (Shiv Sena) भगवा फडकवायचा असेल तर ज्येष्ठांना डावलून चालणार नाही. त्यांना बरोबर घेऊन तसेच त्यांच्या मार्गदर्शनानेच रणनिती आखावी लागेल, असे प्रतिपादन माजी आमदार वसंत गिते (Vasant Gite) यांनी केले...

प्रभाग क्रमांक ७, १२, १३, १४, १५, १६, २३, ३० मधील ज्येष्ठ शिवसैनिक, आजी-माजी पदाधिकारी तसेच महिला पदाधिकारी यांच्याशी शिवसेना महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर (Sudhakar Badgujar), माजी महापौर विनायक पांडे (Vinayak Pandey) यांनी शालिमार येथील शिवसेना मध्यवर्ती कार्यालयात थेट संवाद साधून त्यांची मते जाणून घेतली. त्यावेळी गिते बोलत होते.

नाशिक महानगरात ज्येष्ठ शिवसैनिक आणि माजी पदाधिकारी मोठया प्रमाणात आहेत. शिवसेनेत येण्यास कुणी तयार नव्हते त्याकाळात घरोघरी जावून शिवसेनेचे विचार आमजनतेपर्यंत पोहोचविण्याचे आणि संघटनवाढीसाठी प्रयत्न करणारे आणि वेळप्रसंगी आर्थिक झळ सोसून त्याची वाच्यता न करणाऱ्या ज्येष्ठ सहकाऱ्यांना माझा सलाम, असे माजी महापौर विनायक पांडे (Vinayak Pandey) यांनी सांगितले.

कोणत्याही पदांची अपेक्षा न बाळगता अहोरात्र फक्त पक्षाचाच विचार करणाऱ्या ज्येष्ठांना प्रवाहात आणणे आणि त्यांची मते जाणून घेणे या उद्देशानेच हा संवाद मेळावा आयोजित करण्यात आला आहे. ज्येष्ठ शिवसैनिकांनी अनेक मौलिक सूचना केल्या असून त्याचा आदर बाळगला जाईल, असे महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर (Sudhakar Badgujar) यांनी सांगितले.

व्यासपीठावर माजी उपनगराध्यक्ष अण्णासाहेब लकडे, माजी नगरसेवक विजय पंजाबी, माजी महापौर यतीन वाघ, माजी महानगरप्रमुख सचिन मराठे, माजी नगरसेवक संजय चव्हाण आदी उपस्थित होते.

यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते ज्येष्ठ शिवसैनिक वसंतराव जेजुरकर, रमाकांत शिरसागर, सोमनाथ गुंबाडे, भीमाभाऊ बागुल, शिवाजी बोंदाडे, राधेश्याम गायकवाड, मधुकर संधान, विलास घोलप, अरुण सैंदाणे, शरद इंगळे, विजय काकड, भीमा कोळी, रमेश आघाव, गणेश मुर्तडक, वामन तमखाने, अशोक कचरे, संपत दिघावे, राजेश दरगुडे, प्रदीप शेलार, गोकुळ मोरे, राजू कटारे यांचा सन्मान करण्यात आला.

कार्यक्रमाप्रसंगी नगरसेवक सुनील गोडसे, महनगरसंघटक योगेश बेलदार, उपमहानगर प्रमुख राजेंद्र क्षिरसागर, वैभव खैरे, सचिन बांडे, वैभव खैरे, संतोष ठाकूर, दत्ता दंडगव्हाळ, सचिन चौगुले, शिवसेना पदाधिकारी राजेंद्र देसाई यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com