खेळाडूंचे परिश्रम तुंबलेल्या पाण्यात वाया

श्री छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम मध्ये दहा दिवसांंपासून सरावाला चाप
खेळाडूंचे परिश्रम तुंबलेल्या पाण्यात वाया

नाशिक । सोमनाथ ताकवाले Nashik

जिल्हा परिषदेच्या ( Zilla Parishad ) अखत्यारित असलेले शहरातील मध्यवती ठिकाणचे खेळाडूंचे हक्काचे ठिकाण श्री छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम (Shri Chhatrapati Shivaji Maharaj Stadium Nashik )गेल्या दहा दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाचे पाणी तुंबल्याने तळेसदृष्य ठिकाण झाले आहे. त्यामुळे येथे खेळाडूंना सराव करण्यास आपोआप चाप लागला आहे.या पाण्याचा निचरा जो पर्यंत होत नाही, तोपर्यंत खेळाडूंना मैदानाचा काही उपयोग हो नसल्याची वस्तृस्थिती आहे.

श्री. छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमच्या जवळपास संपूर्ण परिसरात गुडघाभर पाणी साचले आहे. त्याचबरोबर एका भागात झुडूंपाचे साम्राज्य वाढलेले आहे. त्याचबरोबर मेहनत घेऊन तयार केलेल्य खो-खो, फुटबॉल, व्हॉलीबॉल, कबडी, लांब उडी, धावण्याचा ट्रॅक आदी मैदानांमध्ये चिखलाबरोबरच पाण्याचे ठाण असल्याने हा परिसर क्रीडापटूंसाठी निरूपयोगी ठरला आहे. पावसाच्या संततधारेने तुबणार्‍या पाण्याचा स्तर उंचावतच असल्याने पाणी जमीनीत झिरपण्याशिवाय मैदानात तुंबलेल्या पाण्याचा निचरा होण्याची कोणतीच जलनिस्सारण व्यवस्था नाही. त्यामुळे मैदानात साचलेल्या पाण्याची विल्हेवाट पाऊस थांबून ऊन पडल्याशिवाय लागणे शक्य नसते. हा दर पावसाळ्यातील अनुभव असल्याने जिल्हा क्रीडा विभागाने यावर काय, उपाय योजना केली, हा प्रश्न आता क्रीडापटू, पालक, क्रीडा संस्था आणि नागरिकांकडून करण्यात येत आहे.

जिल्हा क्रीडा विभागाने सात-आठ वर्षापूर्वी स्थानिक क्रीडांगणे, तालुकास्तर , जिल्हास्तर आणि विभागस्तर क्रीडांगणे मैदाने विकास करण्यासाठी मोठ्या प्रमाणात विकासकामे केली होती. त्यात नाशिकमध्ये छत्रपती शिवाजी मैदानासह पंचवटीतील ठाकरे मैदान, सैय्यद पिंप्री येथील क्रीडांगण, इगतपुरीत विभागस्तर क्रीडांगण क्रीडापटूंसाठी सज्ज करण्यात आली होती.

श्री. छत्रपती शिवाजी महाराज मैदानातही 10 ते 15 कोटी रुपये खर्चाचा प्रारूप आराखडा तत्कालीन जिल्हा क्रीडा अधिकार्‍यांनी पाठपुरावा करून शासनाकडून मंजूर केला होता. त्याअंतर्गत या मैदाना क्रीडासंबंधी कार्यासंबंधी असलेल्या सुविधा देण्याबरोबरच क्रीडा प्रकाराच्या प्रशिक्षिणांना सुरूवात झाली होती. येथे विविध मैदानाचा विकास करण्यात आला होता. त्याचबरोबर जिल्हा परिषदेच्या शिक्षण, औषध, आरोग्य विभागाचे कार्यालय हलवून येथील क्रीडा सुविधांनाच चालना देण्यात आली होती.

मैदानात सिंस्टेटीक ट्रॅकबरोबरच विविध क्रीडा प्रकारांच्या अत्याधुनिक सुविधांची तरतुद करण्यात आलेली होती. मैदान मध्यवर्ती ठिकाणी असल्याने खेळाडूंना सर्व सुविधा पूरवण्यास सुरूवात झाली होती. त्यानुसार मैदानात क्रीडापटूंची वर्दळ वाढलेली आहे.

पालकांचाही येथे विविध क्रीडा प्रशिक्षणासाठी मुलांना पाठवण्याचा कल दिसून आलेला आहे. दरम्यानच्या काळात करोना आजारामुळे मैदानात क्रीडापटूंना प्रतिबंध असल्याने दरम्यानच्या काळात विकासकामे करण्यात आली. पण सांडपाणी, पावसाचे साचणारे पाणी निचरा करण्याकडे दूर्लक्ष झालेले आहे.

यंदा जानेवारीपासून करोना निर्बध हटवल्याने क्रीडापटूंनी मैदानात सरावाला मोठ्या प्रमाणात येण्यास सुरूवात केली होती. उन्हाळ्याच्या सुट्यात विविध क्रीडा शिबिरांचे येथे आयोजनही झालेले होते.

विविध संस्थांच्या क्रीडा स्पर्धाही नुकताच पार पडलेल्या आहे. पण गेल्या पाऊस सुरू झाल्यापासून मैदानात पाणी साचून असल्याने सर्वच जागा पाण्याखाली आहे. त्यामुळे खेळाडूंना गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे. पाण्याच्या निचरा व्यवस्था करण्याची उपाय योजना क्रीडा विभागाने करावी, अशी मागणी क्रीडापटूंची आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com