प्राथमिक शाळा इमारतीचे स्वप्न भंगले

प्राथमिक शाळा इमारतीचे स्वप्न भंगले

पंचाळे । वार्ताहर | Panchale

येथील जिल्हा परिषदेची (zilha parishad) पहिली ते सातवीपर्यंतच्या प्राथमिक शाळेच्या (Elementary school) नुतन इमारतीसाठी एम्पथी फाऊंडेशनने (Empathy Foundation) पुढाकार घेऊन शाळेसाठी 50 टक्के निधी (fund) देण्याचे आश्वासन दिले होते. यासाठी सामाजिक बांधिलकीतून अकेकांनी मदतीचा हात पुढे केला होता. मात्र, आता फाऊंडेशनकडून नकारघंटा मिळाल्याने ग्रामस्थांचे शाळेसाठी नुतन इमारत (New building) उभारण्याचे स्वप्न भंगले आहे.

ही शाळा 150 वर्ष जुनी असून 70 वर्षापूर्वी येथे ग्रामस्थांनी 5 खोल्यांचे दगडी व कौलारू छप्पर असलेल्या खोल्यांचे बांधकाम केले होते. त्यानंतर कोपरगाव सहकारी साखर कारखाना (Kopargaon Cooperative Sugar Factory), ग्रामस्थ, जिल्हा परिषदेच्या जवाहर रोजगार योजनेतून येथे अद्यापपर्यंत बारा खोल्यांचे बांधकाम करण्यात आले आहे. ही शाळा (school) पहिली ते सातवीपर्यंत असून येथे जवळपास 300 विद्यार्थी (students) शिक्षण (education) घेत आहेत. मात्र, या वर्ग खोल्या 70 वर्षाच्या झाल्याने त्या मोडकळीस आल्या आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना जीव मुठीत धरुन शिक्षण घ्यावे लागत आहे.

यावर उपाय म्हणून ग्रामस्थांनी पाच वर्गखोल्यांचे तीन वर्षांपूर्वी निर्लेखन केले व एम्फथी फाऊंडेशनकडे (Empathy Foundation) अद्ययावत व भव्य इमारतीचा प्रस्ताव सादर केला. फाउंडेशनने तेरा वर्ग खोल्यासाठी 1 कोटी 12 लाखांचा निधी देण्याचे आश्वासन ग्रामस्थांना दिले होते. मात्र, त्यासाठी लोकवर्गणीची अट ठेवली होती. यानुसार ग्रामस्थांनी लोकवर्गणी जमा करण्यास सुरुवात केली. कोरोना (corona) संसर्ग आटोक्यात आल्यानंतर नव्याने निवडून आलेल्या शालेय व्यवस्थापन समितीच्या सदस्यांनी व ग्रामस्थांनी शाळेसाठी निधी (fund) जमा करण्याचा चंग बांधला. त्यासाठी अनेक दानशूर व्यक्तींनी हात पुढे केल्याने बारा लाखांचा निधी शाळेच्या बँक खात्यावर जमा झाला. अद्यापही हे काम सुरुच होते.

त्याप्रमाणे जिल्हा परिषद (zilha parishad) व आमदार माणिकराव कोकाटे (mla manikrao kokate) यांच्या आमदार निधीतून (MLA fund) दोन वर्ग खोल्यासाठी निधी मंजूर झाला होता. त्यामुळे जवळपास 50 लाखांचा निधी जमा करण्याचे ग्रामस्थांचे उद्दिष्ट पूर्ण होणार होते. मात्र, 31 मार्चच्या अखेरीस एम्पथी फाउंडेशनच्या संचालकांची बैठक होेऊन निधीची कमतरता असल्याचे कारण देत शाळेसाठी निधी देता येणार नसल्याचा ठराव करण्यात आला व यापुढील काळात कोणीही मुंबईच्या (mumbai) कार्यालयाशी संपर्क करु नये, अशा आशयाचे पत्र मुख्याध्यापकांना प्राप्त झाले. त्यामुळे अतिशय उत्साहात असणार्‍या शालेय व्यवस्थापन समितीच्या सदस्यांना धक्का बसला असून शाळेच्या इमारतीचे काम प्रलंबित राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

शालेय इमारत बांधकामासंदर्भात एम्फथी फाऊंडेशनच्या विश्वस्त मंडळाची नुकतीच बैठक झाली. चर्चेच्या अनुषंगाने इमारत बांधकामासाठी संस्थेकडे निधीची कमतरता असल्यामुळे शाळेच्या इमारत बांधकाम प्रस्तावास मान्यता देण्यात आलेली नाही. त्यामुळे दिलगीर आहोत.

एम. आर. सुंदरेश्वरम, मुख्य कार्यकारी अधिकारी

देणगीदारांची रक्कम परत करणार शालेय इमारत बांधकामासाठी लोकवर्गणीतून आत्तापर्यंत अनेक दानशूर व्यक्तींनी त्यांच्या इच्छेप्रमाणे 5 हजार ते दीड लाखांपर्यंत वर्गणी दिली आहे. मात्र, मोठी उमेद धरुन इमारतीचे स्वप्न मनामध्ये असताना एम्फथी फाऊंडेशनच्या एका पत्रामूळे संपूर्ण इमारतीचे स्वप्न भंग पावले आहे. ऑगस्टपर्यंत वाट बघू. फाऊंडेशन आपल्या निर्णयावर ठाम राहीलेच तर देणगीदारांची रक्कम त्यांना परत करण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे.

विकास बिरे, उपाध्यक्ष, शालेय व्यवस्थापन समिती

Related Stories

No stories found.