असावे घरकुल आपुले छान! ३६ हजार कुटुंबाचे स्वप्न साकार

असावे घरकुल आपुले छान! ३६ हजार कुटुंबाचे स्वप्न साकार

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

सामाजिक न्याय विभागाच्या (Social Justice Department) रमाई आवास योजनेत (Ramai Awas Yojana) नाशिक विभागातील नाशिक (Nashik), धुळे (Dule), नंदुरबार (Nandurbar), जळगांव (Jalgoan) व अहमदनगर (Ahmadnagar) या पाच जिल्ह्यातील अनुसूचित जातीच्या ३६ हजार २०८ कुटुंबाचे स्वत:च्या हक्काच्या घरकुलाचे स्वप्न साकार झाले आहे. तर २५ हजार २८ घरकुलांचे बांधकामे प्रगतीपथावर आहे...

रमाई आवास योजनेत नाशिक जिल्ह्यात (Nashik District) (शहर, ग्रामीण व नगरपालिका) ५ हजार ८ घरकुले पूर्ण झाली आहेत. तर ९ हजार ३७४ घरकुलांचे कामे प्रगतीपथावर आहेत. धुळे जिल्ह्यात (Dhule District) ४ हजार ३१७ घरकुले पूर्ण झाली आहेत. तर ३ हजार ३०१ घरकुलांचे कामे प्रगतीपथावर आहेत.

नंदुरबार जिल्ह्यात (Nandurbar District) ३ हजार १९३ घरकुले पूर्ण झाली आहेत. तर ७७० घरकुलांचे कामे प्रगतीपथावर आहेत. जळगांव जिल्ह्यात (Jalgoan District) १३ हजार २६४ घरकुले पूर्ण झाली आहेत.

तर ६ हजार ७१८ घरकुलांचे कामे प्रगतीपथावर आहेत. अहमदनगर जिल्ह्यात (Ahmadnagar District) १० हजार ४२६ घरकुले पूर्ण झाली आहेत. तर ४ हजार ८६५ घरकुलांचे कामे प्रगतीपथावर आहेत.

राज्य सरकारने (Maharashtra State Government) अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील कुटूंबांसाठी २००९ यावर्षी रमाई आवास योजना सुरू केली आहे.

अनुसूचित जाती व नवबौद्ध कुटुंबांचे राहणीमान उंचवावे व त्यांच्या निवार्‍याचा प्रश्न सुटावा म्हणून ग्रामीण व शहरी भागांत स्वतः च्या जागेवर अथवा कच्या घराच्या जागेवर २६९ चौरस फूटाचे पक्के घर बांधण्यात येते.

या योजनेची अंमलबजावणी ग्रामीण भागासाठी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, शहरी भागासाठी नगर परिषद / नगरपालिका व महानगरपालिका या स्थानिक यंत्रणेमार्फत करण्यात येते.

ज्या लाभार्थ्यांचे नाव सामाजिक-आर्थिक जात सर्वेक्षण - २०११ यादीमध्ये नाही. परंतु, ज्या लाभार्थ्यांना घराची आवश्यकता आहे. अशा लाभार्थ्यांची नावे प्रपत्र - ड मध्ये असतील तर त्या लाभार्थींची निवड केली जाते.

या योजनेत कच्चे घर असणार्‍या कुटुंबांना नवीन पक्के घर बांधकामासाठी आर्थिक सहाय्य देण्यात येते. घर बांधकामासाठी ग्रामीण भागासाठी १ लाख ३२ हजार रूपये व नक्षलग्रस्त डोंगराळ क्षेत्रासाठी १ लाख ४२ हजार रूपये व नगरपालिका, नगरपरिषद, महानगरपालिका व मुंबई विकास प्राधिकरण क्षेत्रासाठी २ लाख ५० हजार रूपयांचे अनुदान देण्यात येते.

मनरेगा माध्यमातून लाभार्थ्यास ९० दिवसांचा रोजगार उपलब्ध होतो. स्वच्छ भारत मिशनअंतर्गत शौचालय बांधण्यास स्वतंत्र आर्थिक तरतुद करण्यात आली आहे.

अर्जदाराच्या कुटुंबांचे वार्षिक उत्पन्न (Annual income) मर्यादा ग्रामीण क्षेत्रासाठी १ लाख रूपये, नगरपरिषद, नगरपालिका क्षेत्रासाठी १ लाख ५० रूपये, महानगरपालिका क्षेत्र व मुंबई महानगर विकास प्राधिकरण क्षेत्रासाठी २ लाख रूपये इतकी आहे.

या योजनेचा लाभ कुटुंबातील एकाच व्यक्तीस देण्यात येतो. लाभार्थ्याने शासनाच्या इतर गृहनिर्माण योजनेचा लाभ घेतलेला नसावा.

जागा खरेदी करिता ५० हजार

ग्रामविकास विभागाच्या (Rural Development Department) ३० डिसेंबर २०१५ च्या शासन निर्णयानुसार पंडित दिनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थसहाय्य योजना सुरु करण्यात आली आहे.

या योजनेंतर्गत रमाई आवास योजनेतील ग्रामीण क्षेत्रातील दारिद्रय रेषेखालील घरकुलासाठी पात्र असणाऱ्या परंतू जागा उपलब्ध नसणार्‍या लाभार्थ्यांसाठी जागा खरेदी करिता ५० हजार रूपयांपर्यत अर्थसहाय्य देण्यात येते.

योजनेच्या लाभासाठी ग्रामीण भागासाठी तालुकास्तरावर पंचायत समिती किंवा जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा तसेच शहरासाठी सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालयाशी संपर्क साधावा.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com