गट गण प्रारुप रचना हरकतींवर सुनावणी

जिल्हा परिषद
जिल्हा परिषद

नाशिक । प्रतिनिधी | Nashik

जिल्हा परिषदेच्या (zilha parishad) गट-गणांच्या प्रारूप रचनेच्या प्राप्त हरकतींवर तक्रारदारांना भूमिका मांडण्याची संधी देत

विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे (Divisional Commissioner Radhakrishna Game) यांनी सोमवारी (दि.13) त्यांची बाजू ऐकून घेतली. एक- दोन दिवसात या हरकतीवंर विभागीय आयुक्त अंतिम निर्णय घेणार आहे. त्यानंतर अंतिम गट गण रचनेचे चित्र स्पष्ट होईल.

जिल्हा परिषद (zilha parishad) व पंचायत समिती (panchayat samiti) अधिनियमामध्ये झालेल्या सुधारणेनुसार नाशिक जिल्हा परिषदेच्या (Nashik Zilha Parishad) 84 गट आणि पंचायत समितीच्या 168 गणांची प्रारूप रचनेची अधिसूचना जिल्हा प्रशासनाने दोन जूनला जाहीर केली. त्यानुसार जिल्ह्यात 11 गट आणि 22 गण वाढले आहेत. त्यावर 8 जूनपर्यंत हरकती व सूचना मागविण्यात आल्या.

सर्वाधिक हरकती निफाड तालुक्यातील (niphad taluka) गट गणांवर आहे. या ठिकाणी 20 हरकती घेण्यात आल्या आहेत. दिलेल्या मुदतीत तब्बल 93 हरकती प्राप्त झाल्या. या हरकती विभागीय आयुक्तांकडे पाठविण्यात आल्या. त्यावर विभागीय आयुक्तांनी हरकत घेणार्‍यांची बाजू ऐकून घेतली. उद्या देखील ही प्रक्रिया सुरु राहणार असून त्यावर बुधवारी अंतिम निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com