‘त्या’ प्रकरणाबाबत जिल्हा शल्य चिकित्सक निर्णय देणार
USER

‘त्या’ प्रकरणाबाबत जिल्हा शल्य चिकित्सक निर्णय देणार

नाशिक । प्रतिनिधी Nashik

प्रसूतीसाठी दाखल झालेल्या गर्भवतीस रुग्णालयीन महिला कर्मचार्‍याने काल (दि. 12) मारहाण करीत धक्काबुक्की केली व प्रसूतीच्या वेळी डॉक्टरही (doctor) हजर नसल्याने बाळाचा मृत्यू झाल्याचा आरोप बाळंतीण महिलेसह तिच्या नातलगांनी केला होता.

या पार्श्वभूमीवर जिल्हा शल्य चिकित्सक डॉ अशोक थोरात (District Surgeon Dr. Ashok Thorat) यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेत अतिरिक्त शल्यचिकित्सक (additional surgeons) यांच्या अध्यक्षतेखाली त्रिसदस्यीय समिती नेमली होती. समिती आज (दि.13) रोजी अहवाल जिल्हा शल्यचिकित्सक यांच्याकडे अहवाल सुपूर्द करणार आहे. दरम्यान, समिती मध्ये अतिरिक्त शल्य चिकित्सक डॉ श्रीवास, डॉ. गाजरे आणि अधिपरिचारिका यांच्या प्रमुख यांचा समावेश आहे. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ अशोक थोरात यांना आज अहवाल सादर करण्यात येणार असून त्यावर ते निर्णय देणार आहेत.

या प्रकरणी बाळंतीण महिलेने जिल्हा रुग्णालय (District Hospital) प्रशासनासह सरकारवाडा पोलिसांकडे (Sarkarwada Police) तक्रार अर्ज दिला होता. डॉक्टर (Doctor) आणि सफाई कर्मचार्‍यावर कारवाई करावी, अशी मागणी पीडित महिलेच्या कुटुंबीयांनी केली, तसेच कारवाई होत नाही तोपर्यंत बाळाचा मृतदेह ताब्यात न घेण्याचा पवित्रा घेतला होता. चौकशीनंतर कारवाईचे आश्वासन मिळाल्यावर कुटुंबीयांनी मृतदेह ताब्यात घेतला होता.

पेठ तालुक्यातील (Peth taluka) रहिवासी हिरा कैलास पगारे यांना मंगळवारी (दि. 9) रात्री प्रसूती कळा आल्याने कुटुंबीयांनी पेठ येथील रुग्णालयातून जिल्हा रुग्णालयात दाखल केले होते. दरम्यान, हिरा यांच्या आरोपांनुसार, पहाटे 4 च्या सुमारास कळा असह्य झाल्याने त्या वॉर्डातील बाथरूमच्या दिशेने जात असताना सफाई कर्मचार्‍याने त्यांना अडविले.

कर्मचार्‍याने शिवीगाळ करीत हिरा यांना भिंतीवर ढकलले, तसेच ‘तुझ्यावर केस करून तुरुंगात पाठवेन आणि तेथेच प्रसूती केली जाईल’ असे म्हणत हिरा यांना मारहाण केली. या घटनेत भिंतीवर ढकलून दिल्याने पीडिता खाली पडून तिच्या पोटाला मार लागला होता. दुसर्‍या दिवशी सकाळी प्रसूतीच्या वेळी डॉक्टरही उपस्थित नसल्याचा आरोप त्यांनी केला होता.

हलगर्जीपणामुळे बाळाच्या डोक्याला मार लागला. त्यामुळे त्यास एसएनसीयू विभागात ठेवण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. पीडितेने याबाबत कुटुंबीयांना सांगितल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. कुटुंबीयांनी जिल्हा शल्यचिकित्सक आणि सरकारवाडा पोलिस ठाण्यात धाव घेत सफाई कर्मचारी व डॉक्टरांविरोधात तक्रार अर्ज दिला आहे. मुजोर कर्मचार्‍यावर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com