
नाशिक | प्रतिनिधी | Nashik
शेतीच्या बाधांच्या कारणांवरून होणार्या वाद (argument) व वैमन्यसाबाबत जिल्हा सत्र न्यायालयाने (District Sessions Court) चिंता व्यक्त केली.
याबाबत आपले निरीक्षण नोंदविताना न्यायालयाने नमुद केले आहे की, अशा शुल्लक कारणावरून दोन शेजार्याचे संबंध बिघडून त्या़च्यात अकारण शत्रूत्व निर्माण होते व ते पुढच्या पिढीपर्यंत चालते.
याबाबत दोन्ही पक्षांनी समजुतीने सदर वाद हा न्यायालयात भांडण्यापेक्षा वैकल्पिक वाद (Alternative arguments) निवारण केंद्राचे मदतीने मिटविला तर सर्वांचे संबध सलोख्याचे राहतील. असे जिल्हा व सत्र न्यायाधीश डॉ उमेशचंद्र मोरे (District and Sessions Judge Dr. Umeshchandra More) यांनी वडीलकीच्या नात्याने म्हटले आहे. साधू संवाद, मिटू वाद या संकल्पने प्रमाणे जर दोन्ही बांधावरील शेतकर्यांनी (farmers) वाद मिटवण्याकरता चर्चा केली, संवाद साधला, तर तो वाद मध्यस्थी द्वारे नक्कीच मिटुू शकतो. हे त्यांनी स्पष्ट केले.
सिन्नर पोलीस ठाण्यात (Sinnar Police Station) 11/07/2007 रोजी मारूती बन्सी बिन्नर (रा.हिवरे तालुका सिन्नर) व इतर यांचे विरूद्ध रामनाथ सदगीर यांनी शेताचे बांधावरून झालेल्या वादातून मारहाण (beating) केल्याप्रकरणी तक्रार दाखल केली होती. सदर फिर्यादीवरून दाखल झालेल्या खटल्याचे कामकाज सिन्नर (sinnar) येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांचे न्यालयात पुर्ण झाले व न्यायधिशांनी मारूती बिन्नर यास सहा महिन्यांची सक्त मजुरीची शिक्षा व 1000 रू. दंड अशी शिक्षा (Punishment as fine) ठोठावली होती.
प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांनी ठोठावलेली शिक्षा जिल्हा न्यायालयाने केली कायम केली. सदर शिक्षेविरोधात अर्जदार आरोपीने मे जिल्हा व सत्र न्यायाधीश डॉ.यु जी.मोरे यांचे न्यायालयात अपील दाखल केले होते.सदर अपीलाची सुनावणी होऊन जिल्हा व सत्र न्यायालयाने सदरचे अपील फेटाळून लावले व प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांनी ठोठावलेली शिक्षा कायम केली. त्यानंतर वरील मत त्यांंनी नोदवीले. किरकोळ कारणांमुळे दाखल होणार्या केसेसचे प्रमाण वाढल्याबददल चिंता व्यक्त केली. सरकार पक्षाचे वतीने सरकारी वकिल शिरीष . कडवे यांनी काम पाहीले