दारणा, नांंदुरमध्यमेश्वरमधून पाण्याचा विसर्ग

दारणा, नांंदुरमध्यमेश्वरमधून पाण्याचा विसर्ग
नाशिक पाऊस

नाशिक | Nashik

नाशिक जिल्ह्याला (Nashik District) ६५.५७ टकके पाऊस झाला आहे. पावसाने चांगलाच दिलासा दिला आहे.

आजही दारणा धरणातुन (Darana Dam) १५० क्युसेक्स पाणी सोडण्यात येत आहे. नांंदुरमध्यमेश्वरमधुन (Nandurmadhyameshwer Dam) १२११ क्युसेस वाहत होते. भावली धरणातुन (Bhawali Dam) १३५, वालदेवीतुन ६५, हरणबारीतुन (Haranbari) ८४६ क्युसेस पाणी सोडले जात आहेे.

गंंगापुर (Gangapur Dam) ८६ टक्के भरले आहे. पालखेड ७५, चणकापुर ७३ टक्के, गिरणा (Girana Dam) ४४ टक्के भरले आहे. नाशिक मध्ये आज दिवसभर पावसाने विश्रांती घेतली मात्र ढगाळ वातावरणामुळे हवेत गारठा निर्माण झाला.

गेल्या २४ तासात तालुका निहाय पडलेला पाऊस मिलीमिटर मध्ये असा :

नाशिक १२, इगतपुरी २५, दिंडोरी ०३, त्र्यंबक १५, पेठ २४, नांदगाव ०५, बागलान ०३, सुरगाणा १५, निफाड २४, देवळा ०४, सिन्नर ०४, येवला ०५ असा पाऊस झाला.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com