जिल्हा बँकेने जप्तीची कारवाई तत्काळ थांबवावी

कारवाई विरोधात न्यायालयात दाद मागण्याचा निर्धार
जिल्हा बँकेने जप्तीची कारवाई तत्काळ थांबवावी

निफाड । प्रतिनिधी Niphad

शेतकरी अडचणीच्या काळातुन वाटचाल करीत असतांना जिल्हा बँक ( District Bank ) शेतकर्‍याच्या 7/12 उतार्‍यावर ( 7/12 Extract ) भोगवटदार म्हणून नाव लावत जप्तीची (confiscation) कारवाई करीत आहे. या कारवाई विरोधात शेतकर्‍यांना बरोबर घेवून न्यायालयात दाद मागितली जाईल.

तसेच मंत्री, खासदार, आमदार यांनीही शासनदरबारी पाठपुरावा करुन जिल्हा बँकेची ही कर्जवसूलीची मोहीम थांबवावी. शेतकर्‍यांनी पक्ष संघटना बाजूला ठेवून शेतकरी ही जात समजून एका व्यासपीठावर येवून ही लढाई लढावी त्यासाठी मी सर्वात पुढे राहिल असे प्रतिपादन शेतकरी बचाव कृति समितीचे समन्वयक मधूकर ढोमसे यांनी केले आहे.

निफाड उपबाजार आवार सभागृहात तालुक्यातील कर्जदार शेतकर्‍यांची बैठक ढोमसे यांचे अध्यक्षतेखाली संपन्न झाली. याप्रसंगी शेतकर्‍यांना मार्गदर्शन करतांना ते बोलत होते. गेल्या महिनाभरापासून आपण तालुक्याच्या वेगवेगळ्या भागात शेतकर्‍यांच्या बैठका घेत त्यांना एकत्र करीत आहोत. अवघ्या जगाचा पोशिंदा शेतकरी असून तो कर्जमुक्त झाला पाहिजे हीच आमची प्रामाणिक इच्छा आहे. यावेळी पं.स. सदस्य शिवा सुरासे म्हणाले की, कोण कोणत्या पक्षाचा हे महत्वाचे नाही. शेतकरी म्हणून सर्वांनी एकत्र आले पाहिजे.

वेळप्रसंगी खासदार, आमदार, मंत्री यांच्या गाड्या अडवू. परंतु शेतकर्‍यांचा हा प्रश्न येत्या अधिवेशनात मांडून तो सोडविण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजे असे मत व्यक्त केले. तर संपत डुंबरे म्हणाले की, जिल्हा बँकेच्या चुकीच्या धोरणामुळे सहकार अडचणीत आला. सध्या जिल्हा बँकेची सुरू असलेली जप्तीची मोहीम चुकीची असून शेतकर्‍यांनी याविरोधात संघटीत होवून लढा दिला पाहिजे असे प्रतिपादन केले. यावेळी अशपाक शेख, निवृत्ती कोल्हे, जगन्नाथ कुटे यांनीही मनोगत व्यक्त केले.

याप्रसंगी रयत क्रांती संघटनेचे प्रदेश अध्यक्ष शिवनाथ जाधव, जिल्हाध्यक्ष वाल्मिक सांगळे, संजय वाबळे, दत्तू सुडके, रामकृष्ण दराडे, केशव जाधव, प्रभाकर मापारी, संदिप पानगव्हाणे, अब्दुल शेख, निवृत्ती कोल्हे, साहेबराव पानगव्हाणे, दिनकर वाबळे, वसंत गुजर, पतिंग ढोमसे, सदाशिव बोरगुडे, भिमराज पवार, दत्तात्रय आहेर, रवींद्र पुंड, सुभाष कारे, नंदू चव्हाण आदींसह शेतकरी उपस्थित होते.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com