'वॉटरग्रेस' सेवकांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

'वॉटरग्रेस' सेवकांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

नाशिक । प्रतिनिधी Nashik

नाशिक महापालिकेतील (NMC )शहर स्वच्छतेचे कंत्राट असलेल्या ‘वॉटरग्रेस’ प्रोडक्ट्स कंपनीतील(Watergrace Products Company) स्वेच्छेने महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेच्या युनियनचे सदस्यत्व स्वीकारलेल्या जवळपास 650 कंत्राटी कामगारांना ठेकेदारांनी बेकायदेशीररीत्या काढल्यामुळे या कामगारांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नाशिक दौर्‍या दरम्यान शहराध्यक्ष दिलीप दातीर यांच्यासह मनसेना कामगार सेना पदाधिकार्‍यांनी ‘वॉटरग्रेस’ कामगारांचा प्रश्न त्यांच्या समोर मांडला होता.दरम्यान महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेचे अध्यक्ष मनोज चव्हाण, सरचिटणीस संतोष धुरी यांच्यासह महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेत या कामगारांच्या वतीने त्यांना निवेदन देत याबाबत जातीने लक्ष घालण्याचे साकडे घातले.

करोना काळातील आपल्या जीवाची बाजी लावून स्वच्छता करणार्‍या या करोना योद्यांना बेकायदेशीररीत्या कामावरून कमी केल्याने शेकडो कामगारांच्या घरी चुली पेटत नसून या गोरगरीब कामगारांसह त्यांच्या कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ आली आहे. या कामगारांना न्याय द्या, अशी मागणी करण्यात आली.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com