दादा भुसे यांना आव्हान देणारा ‘हिरा’ लवकरच उद्धव गोटात

दादा भुसे यांना आव्हान देणारा ‘हिरा’ लवकरच उद्धव  गोटात

नाशिक | प्रतिनिधी Nashik

पालकमंत्री दादा भुसे यांच्या नेतृत्वाखाली सातत्याने शिवसेनेला हादरे देण्याचा प्रत्यत्न चाललेला होता. ग्रामीण भागातून मोठ्या प्रमाणात शिंदे गटातील आवक वाढली होती.

त्याच पार्श्वभुमीवर पालकमंत्र्यांना त्यांच्याच विभागात शह देण्याचा प्रयत्न सूरू झाला असून, त्यासाठी हिरे कुटुंबातील अद्वय हिरेंच्या माध्यमातून हजारो कार्यकर्ते महिना अखेरपर्यंत उद्धव बाळासाहेब गटात प्रवेश घेणार असल्याने मालेगावात ठाकरे गटाची ताकद वाढणार असल्याची चर्चा आहे.

माजी मंत्री प्रशांत दादा हिरे यांचे सुपुत्र डॉ.अद्वय हिरे यानी रवीवारी कार्यकर्त्यांची बैठक नाशकात घेतली. यामध्ये त्यांनी संवाद साधून याबाबत कार्यकत्यांची भूमिका जाणून घेतली. यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांनी एकमताने उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात प्रवेश घेण्यावर शिक्का मोर्तब केला.

जानेवारी महिन्याच्या अखेरपर्यंत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत डॉ. अद्वय हिरे हे त्यांच्या हजारो कार्यकर्त्यांसह शिवबंधन बांधणार आहेत. त्यांच्या उद्वव गटातील प्रवेशामुळे मालेगावात पुन्हा एकदा ठाकरे शिवसेना गटाचे वर्चस्व वाढण्यास मदत होणार असल्याचे जाणकारांचे मत आहे. उध्ववसेना आता हिरेंच्या माध्यमातून पालकमंत्री दादा भुसे याच्यासमोर आव्हान निर्माण करण्यासाठी सज्ज झाल्याचे चित्र आहे.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com